Kasara Railway Station Saam tV
महाराष्ट्र

Railway Accident News : कसारा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसने 3 कामगारांना उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Accident News : कामगार कल्याण, नासिक, इगतपुरी येथील असून हे कामाला कसारा रेल्वे स्टेशनला होते.

साम टिव्ही ब्युरो

फय्याज शेख

Kasara News : मध्य रेल्वे मार्गावरील कसारा स्थानकाजवळ एक दुर्दैवा घटना घडली आहे. अचानक आलेल्या एक्सप्रेस ट्रेनने 3 कामगारांना धडक दिली आहे. यामध्ये 3 कामगारांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

कामगार कल्याण, नासिक, इगतपुरी येथील असून हे कामाला कसारा रेल्वे स्टेशनला होते. पॉईंटवर हे तीन कामगार काम करत असताना अचानक एक्स्प्रेस आली. पाऊस जोरात असल्याने या कामगारांच्या एक्स्प्रेस आल्याचं लक्षात आलं नाही. एक्स्प्रेसने तिन्ही कामगारांना उडवले. त्यातील एक कामगार ट्रॅकखाली आल्याने मृत्यू झाला आहे.

कसारा रेल्वे स्थानकाअंतर्गत येणाऱ्या SNT डिपार्टमेंटमध्ये काम करणारे हे कामगार आहेत. आज संध्याकाळी कसारा पाईंट डाऊन मार्गावर काम करत असताना कल्याणहून कसारा रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होती. मात्र मुसळधार पाऊस पडत असताना एक्स्प्रेस येत असल्याचे या तिन्ही कामगारांच्या लक्षात आले नाही.

एक्स्प्रेसने या तिन्ही कामगारांना उडवले. यात रिजवान आलम हा कामगार ट्रॅक खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर नीलम मिश्रा व उमेश सिंग हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिजवान आलम हा इगतपुरी येथील राहणारा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

Sunday Horoscope : कामात नवी संधी मिळेल! ५ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sunday Horoscope: पैसा आणि नवी संधी, 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा रविवारच राशिभविष्य

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

SCROLL FOR NEXT