NCP leader Sunil Tatkare and BJP state president Ravindra Chavan during a crucial meeting over Raigad Zilla Parishad power formation Saam Tv
महाराष्ट्र

तटकरेंचा भाजपबरोबर तह, शिंदेसेनेला शह? रायगड झेडपीत सत्तेसाठी तटकरेंची रणनीती

Raigad Zilla Parishad Majority Calculation 2026: रायगड जिल्हा परिषदेसाठी महायुतीत चांगलंच रस्सीखेच सुरु आहे. सुनील तटकरेंनी भाजपबरोबर तह करत शिंदेसेनेला शह दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सेनेविरोधात रायगडमध्ये कशी रणनिती आखलीय?

Suprim Maskar

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या या भेटीनं अनेकाचं लक्ष वेधून घेतलं...मात्र य़ा भेटीला निमित्त होतं... रायगड जिल्हा परिषदेचं.....रायगडमध्ये जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करण्यासाठी महायुतीतच जोरदार रस्सीखेच सुरु झालीय.. निवडणुकीत सर्वाधिक जागा शिंदेसेनेला मिळाल्या असल्या तरी सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादीच्या हाती आहेत...त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शिंदेसेनेविरोधात मोठी गुगली टाकत रायगडमध्ये भाजपसोबत सत्तास्थापनेची तयारी सुरु केलीय...

रायगड जिल्हा परिषदेत पक्षीय बलाबल कसे आहे... आणि राष्ट्रवादी शिंदेसेनेची कशी कोंडी करणार पाहूयात.....रायगड जिल्हा परिषदेत शिंदेसेनेला 21, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 16, भाजपला 15, तर ठाकरेसेनेला 5 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्यात... त्यामुळे बहुमतासाठी 30 जागा लागणार असून भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास दोघांचे संख्याबळ 31 होतंय...

दुसरीकडे शिंदेसेनेला रायगडमध्ये सत्ता स्थापनेसाठी आणखी 10 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजप सत्तास्थापनेसाठी मदत करेल असा आशावाद शिंदेसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केलाय.. रायगड जिल्ह्यात मंत्री गोगावले आणि तटकरे समर्थकांमधील संघर्ष अनेकदा समोर आलाय... अशातच जिल्हा परिषदेच्या निकालानंतर तटकरेंनी शिंदेसेनेला बाजूला सारत भाजपशी साधलेली जवळीक शिंदेसेनेच्या तोंडचा घास ओढून घेणारी ठरणार का? रायगड जिल्हा परिषदेत 'महायुती' धर्म पाळला जाणार की तटकरेंची शिंदेसेनेला शह देण्याची खेळी यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहित शेट्टी प्रकरणात मोठी अपडेट; फायरिंगसाठी वापरलेले शस्त्र जप्त

अजित दादांच्या अपघातानंतर VSRचा मालक का पळाला? रोहित सिंगला पळून जाण्यासाठी कुणाची मदत?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे AI व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर होणार कारवाई

APP Leader Shot Dead: लग्न समारंभात गोळीबार; डान्स करणाऱ्या सरपंचाच्या डोक्यावर झाडल्या गोळ्या, १२ दिवसात ३ नेत्यांची हत्या

Narhari Zirwal: नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन समोर, लाच घेतानाच्या VIDEO ने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT