Raigad Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: नवऱ्याचा मित्राच्या साहाय्याने बायकोवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला, कपडे धुताना अंगावर आले; नेमकं घडलं काय?

Husband attacks wife Raigad News: मित्राच्या मदतीनं पतीनं केला पत्नीचा काटा काढण्याचा प्रयत्न. पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

आंतरराष्ट्रीय महिला दिनालाच महिलेवर प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीनं आपल्या मित्रासोबत पत्नीवर प्राणघात हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी असून, तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा गावात घडली असून, पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रायगड जिल्ह्यातील म्हसळा गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पतीनं आपल्या पत्नीचा काटा काढण्यासाठी मित्राच्या मदतीनं प्राणघातक हल्ला केला आहे. महिला घरात कपडे धुवत असताना तिच्यावर हल्ला केला आहे. हल्ला करण्यासाठी पतीनं आणि त्याच्या मित्रानं लाकूड आणि सक्रू ड्रायव्हरचा वापर केला आहे.

पहिलं पतीनं पत्नीच्या डोक्यात लाकडाने वार केले. नंतर हातावर देखील वार केले. लाकडानं जबर मार दिल्यानंतर त्याच्या मित्रानं सक्रू ड्रायव्हरचा हल्ला करण्यासाठी वापर केला. मित्रानं महिलेच्या गळ्यावर दोन ते तीन वेळा स्क्रू ड्रायव्हरने वार केले. या प्राणघातक हल्ल्यात महिला जखमी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी पती दुर्वेश धाडवे आणि त्याच्या मित्राविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीनं हा हल्ला नेमका कशासाठी आणि का केला? याचा तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT