...तर शेकापच्या नेत्यांना डब्बा घेऊन कामावर जावे लागेल! राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

...तर शेकापच्या नेत्यांना डब्बा घेऊन कामावर जावे लागेल!

शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची शेतकरी कामगार पक्षावर जहरी टीका!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : शेकापला जिल्हा परिषदेवर सत्ता असणे हे सर्वात महत्वाचे आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापला बाहेरचा रस्ता दाखवणार आहोत. शेकापची सत्ता गेल्यास नेत्यांना कामावर डब्बे घेऊन जावे लागले अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे. त्याचबरोबर शेकापच्या नेत्यांना आता सकाळीच लोकांच्या घरी जावे लागत आहे. अनेक वर्षे आमदारकी असूनही शेकापच्या नेत्यांनी काही केले नाही म्हणून मला मतदारांनी संधी दिली आहे. मतदारांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे मत आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील पहा :

अलिबाग-रोहा-कणघर-वावे या 91 किलोमीटर हायब्रीड अन्युइटी अंतर्गत रस्त्याच्या कामाचा भूमीपूजन सोहळा अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी याच्या शुभहस्ते बेलकडे येथे पार पडला. यावेळी बोलताना आमदार दळवी यांनी यावेळी शेकापच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, गटनेत्या मानसी दळवी, शिवसेना तालुका प्रमुख राजा केणी, काँग्रेस उपाध्यक्ष अनंत गोधळी, संतोष निगडे, महाविकास आघाडीचे नेते, बांधकाम विभागाचे अधिकारी व मोठ्या प्रमाणात नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते.

अलिबाग रोहा हा रस्ता गेले अनेक वर्षे रखडलेला होता. महाविकास आघाडी सरकारने रस्त्यासाठी 177 कोटी निधी मंजूर केला आहे. ठेकेदाराने तीन वर्षात हा रस्ता पूर्ण करायचा आहे. मात्र, शेकाप नेते हे आम्ही रस्ता मंजूर केला असल्याचे भासवत आहेत. माजी आमदार पंडित पाटील यांच्या सुप्रभात कंपनीकडे साळव मुरुड रस्त्याचे काम असूनही अद्याप तो रस्ता पूर्ण झालेला नाही. ते त्याकडे दुर्लक्ष करीत असून दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा हा शेकाप नेत्यांचा गुणच आहे अशी टीका आमदार दळवी यांनी आपल्या भाषणातून केली. आगामी निवडणुकीत शेकापला अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातून हद्दपार करू असेही दळवी यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

Maharashtra Live News Update: सांगली पोलिसांकडून 1 कोटी 11 लाख सहाशे रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त

Horoscope: आजचा दिवस आनंद, सुख समृद्धीचा; ६ राशींच्या जीवनात घडणार मोठा बदल, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

पुणे पोलिसांचा दणका! निलेश घायवळनंतर सख्खा भाऊ सचिनवरही मकोका, VIDEO

SCROLL FOR NEXT