Raigad Mangaon Tamhini Ghat Bus Accident Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला ताम्हिणी घाटात अपघात, ५ ते ६ जण गंभीर जखमी

Raigad Mangaon Tamhini Ghat Bus Accident : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात पुण्याहून माणगावकडे येणाऱ्या खासगी बसचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून ५ ते ६ जण गंभीर आहेत.

Alisha Khedekar

  • रायगडच्या ताम्हिणी घाटात खासगी बसचा भीषण अपघात

  • बसचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली आदळली

  • २० प्रवासी जखमी, ६ जण गंभीर; उपचार सुरू

  • पोलीस तपास सुरू

रायगडमध्ये एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून माणगावच्या दिशेने येताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून खाली उतरली. या दुर्घटनेवेळी बसमध्ये २० प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान या सगळ्या प्रवाशांना दुखापत झाली आहे. त्यामधील ५ ते ६ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस या दुर्घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून एक खासगी बस माणगावच्या दिशेने येत होती. या बसमधून २० प्रवासी प्रवास करत होते. ही बस ताम्हिणी घाटात येताच बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. ही बस रस्त्यावरून खाली उतरून आदळली. मात्र सुदैवाने चालकाच्या तत्परतेने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून गाडीचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.

ताम्हिणी घाट हा वळणावळणाचा असल्याने, हा घाट अपघात प्रवण क्षेत्रात येतो. दरम्यान या अपघातात २० जण जखमी झाले असून ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला? चालक गाडी चालवताना मद्यधुंद होता का ? याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT