Sunil Tatkare Bharat Gogawale Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Politics : रायगडात शिवसेना-राष्ट्रवादीत वाक् युद्ध, उमेदवार पाडण्यावरुन तटकरे-गोगावलेंमध्ये जुंपली

Sunil Tatkare Bharat Gogawale : रायगडमध्ये निवडणूकांच्या वेळी शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रतिनिधींनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीकडून प्रतिउत्तर देण्यात आले.

Vinod Patil

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

Raigad Politics : राज्यात पालकमंत्रिपदावरुन झालेला तिढा काहीप्रमाणे सुटला आहे. पण काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही कायम आहे. रायगड जिल्ह्यात पालकमंत्रिपदावरुन मोठा राडा झाला. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरेंची निवड करण्यात आली. दरम्यान यामुळे शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झाले. वाद वाढत गेल्याने रायगड पालकमंत्रिपदाबद्दलच्या निर्णयाला स्थगिती दिली.

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताविस्तारावरुन घटक पक्षांमध्ये जुंपली असल्याचे चित्र पाहायला मिळते. रायगड जिल्ह्यातही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्रिपदाच्या विस्तारानंतर रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. यात आणखी भर पडली आहे.

रायगडच्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करण्यात आले आहेत. निवडणूक काळात युतीचा धर्म न पाळता शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचे काम राष्ट्रवादीने केले असे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे. याला सुनील तटकरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. 'माझ्यावर ज्यांनी निराधार आरोप केले, त्यांचं पुढं काय झालं हे सर्वांनी पाहिलंय', असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

सुनील तटकरेंच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही ऐरेगैरे नाही, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न केले नाहीत हे त्यांनी बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगावं' असे आव्हान भरत गोगावले यांनी दिले आहे. हा वाद धुमसत राहल्याने रायगडचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT