Mahendra Dalvi Tatkare controversy Saamn TV marathi
महाराष्ट्र

Tatkare family : तटकरे कुटुंब भाजपमध्ये जाणार होतं, सत्ताधारी आमदाराचा खळबळजनक दावा, रायगडच्या राजकारणात भूकंप

Tatkare family was going to join BJP claim : रायगडच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा केला. अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावरही दळवींनी जोरदार टीका केली.

Namdeo Kumbhar

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी

Mahendra Dalvi Tatkare controversy : तटकरे कुटुंब भाजापात जाणार असल्याचा दावा शिंदेंच्या आमदाराने केल्याने रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे कुटुंबाबाबत अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. तटकरे कुटुंब हे भाजपमध्ये प्रवेश करणार होतं, असा थेट आरोप करत दळवी यांनी केला आहे. दळवींच्या या दाव्याने महायुतीतील अंतर्गत राजकीय वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे.

एवढ्यावरच न थांबता, महेंद्र दळवी यांनी अनिकेत तटकरे यांच्यावर अत्यंत शेलक्या अन् बोचऱ्या शब्दांत टीका केली. अनिकेत तटकरे हे सरोगसी बाळ आहेत, असा वादग्रस्त उल्लेख दळवी यांनी केला. दळवी यांच्या या वक्तव्यानंतर रायगडसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आता यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तटकरे कुटुंबाचा भाजपमध्ये होणार होता प्रवेश: आमदार महेंद्र दळवी

शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आमदार अनिकेत तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. विधान परिषद निवडणुकीचा उल्लेख करत दळवी यांनी अनिकेत तटकरे यांना 'सरोगसी बाळ' अशी उपमा दिली. भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यामुळेच हे 'सरोगसी बाळ' जन्माला आले, असा थेट हल्लाबोल आमदार दळवी यांनी केला.

अनिकेत तटकरेंनी सरोगसी बाळ म्हणजे काय हे आधी आपल्या बापाला विचारावे; म्हणजे तटकरेंनी अशी किती सरोगसी बाळे जन्माला घातली आणि वाऱ्यावर सोडून दिली, हे देखील समोर येईल, अशा शब्दांत दळवी यांनी टीकेची झोड उठवली. नेहमीप्रमाणे सर्व काही स्वतःच्याच घरात हवे, हा तटकरेंचा स्वभाव आहे. आज जर अजित पवार (सक्रिय) असते, तर सुनील तटकरे यांना पक्षातून बाहेर काढण्याची तयारी पूर्ण झाली होती. एवढेच नव्हे, तर तटकरे कुटुंब स्वतः भाजपमध्ये प्रवेश करणार होते, असा दावाही दळवी यांनी केला.

पालकमंत्री भरत गोगावले यांच्या नागरी सत्कार समारंभात आमदार थोरवे यांनी डागली राष्ट्रवादीवर तोफ

रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरत गोगावले यांच्या नागरी सत्कार समारंभात आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार तोफ डागली. तटकरे आणि राष्ट्रवादीकडून होणाऱ्या राजकारणाचा उल्लेख करत, थोरवे यांनी भरत गोगावले यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. परवापासून आम्हाला काही सांगू नका. महेंद्र दळवी यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही एकदा संघर्ष सुरू केला, की मग थांबणार नाही, असा निर्वाणीचा इशाराच आमदार थोरवे यांनी व्यासपीठावरून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT