Raigad Harihareshwar boat Saam TV
महाराष्ट्र

Raigad boat : रायगड संशयित बोट प्रकरण; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

या गोष्टीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

साम टिव्ही ब्युरो

रायगड : रायगडच्या (Raigad) समुद्रकिनारी एक संशयित बोट आढळली. हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर ही स्पीड बोट आढळून आली. या बोटीमध्ये एके-४७ आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. बोटीमध्ये एकूण तीन बंदुकांनी भरलेली बॅग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त रायगड पोलीस गस्त घालत असताना ही बोट (boat) आढळली आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

प्राप्त माहितीनुसार, या बोटीत एकही व्यक्ती सापडला नसून बोटीत तीन एके ४७ आढळल्या आहेत. तसेच अनेक कागदपत्रेही सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच नाकाबंदी सुद्धा करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बोट कुठून आली?

दरम्यान, ही बोट कुठून आली याबाबतची अपडेट समोर आली आहे. आढळून आलेली बोट ही एक ऑस्ट्रेलियन बोट असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात दिली. या बोटीचे नाव लिडिहान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉंडरर्स गन या महिलेची आहे. तिचे पती जेम्स हार्बट हे सदर बोटीचे कप्तान असून ही बोट मसकत येथून युरोपकडे जाणार होती.

26 जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि बोटीवर असलेल्या खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. दुपारी १ वाजेच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केले.

समुद्र खवळलेला असल्याने लेडीहान या बोटीचे टोईंग करता आले नाही. त्यानंतर समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकट ही नौका रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली. अशी माहिती भारतीय कोस्टगार्डकडून प्राप्त झाली. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT