Raigad Vagya Dog  Raigad
महाराष्ट्र

Raigad: रायगडावरील समाधीचं राजकारण वाघ्याला हटवा; पुरावा द्या, नाहीतर..

Raigad Vagya Dog: औरंगजेबाच्या कबरीचा वाद ताजा असताना रायगडावरील वाघाच्या समाधीवरुन राजकारण सुरु झालंय. समाधी हटवण्याच्या मागणीचा संभाजीराजे छत्रपतींनी पुनरुच्चार केलाय. तर दुसरीकडे काही जणांनी मात्र समाधीचं समर्थन केलंय. पाहूया कसा वाद रंगलाय या रिपोर्टमधून..

Girish Nikam

आता राज्यात वाद सुरू झालाय तो रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधीवरून. कुत्र्याची समाधी काढून टाकण्याच्या मागणीचा माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पुनरुच्चार केला. समाधीची कुठेच ऐतिहासिक नोंद नाही. संरक्षित स्मारकात नोंद नाही, कुत्र्याची समाधी महाराजां पेक्षा जास्त उंचीची आहे, असे मुद्दे मांडत 31 मेपर्यंत ही समाधी हटवण्याची मागणी केलीये. तर दुसरीकडे वाघ्यासाठी काही जण पुढे सरसावलेत.

रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवू देणार नाही, गरज पडल्यास न्यायालयात जाऊ असा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी दिलाय. तर इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी १८०० शतकातील नोंदी आणि एका जर्मन पुस्तकाचा संदर्भ देत समाधीचं समर्थन केलंय. ाघ्याचा वाद याआधीही झाला होता.संभाजी ब्रिगेडने 2012 मध्ये रायगडावरुन वाघ्याची समाधी हटवली होती. एका दशकानंतर पुन्हा वाघ्या कुत्र्यावरुन वाद उफाळलाय. या समाधीचा काय इतिहास आहे पाहूया.

वाघ्याची समाधी वादात

'वाघ्या' हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा,अशी आख्यायिका

1680 छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन, वाघ्याचं चितेत उडी देऊन बलिदान अशी वदंता

समाधीची प्रत्यक्ष उभारणी 20व्या शतकात,समाधीला इंदूरच्या तुकोजी होळकरांकडून निधी

स्मारक ऐतिहासिक नव्हे, तर लोकश्रद्धेचे प्रतीक

यापूर्वीही, 2011 मध्ये संभाजी ब्रिगेडकडून वाघ्याच्या पुतळ्यावर हल्ला

भारतीय पुरातत्व विभागाकडे वाघ्याबाबत कोणतेही ठोस पुरावे नाही

दरम्यान इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनीही वाघ्या संदर्भात इतिहासात कोणताही ठोस पुरावा नाही नसून राम गणेश गडकरींच्या डोक्यातून ही कल्पना आली असा दावा केलाय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनीही अधिवेशनात चुकीचा इतिहास रंगवलेल्या काही पुस्तके, नाटक आणि सिनेमांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. औरंगजेबाची कबर तर कधी वाघ्याची समाधी.इतिहासातील जुने मुद्दे उकरुन काढून त्याचं राजकारण केलं जातंय. आणि राज्यातल्या जनतेशी निगडीत अनेक महत्वाचे प्रश्न मात्र असेच वाऱ्यावर सोडले जातायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

SCROLL FOR NEXT