Raigad News Snake Bite Saam tv
महाराष्ट्र

Raigad News : सर्पदंशाने विवाहीत तरुणीचा मृत्यू; माणगाव येथील घटना

Raigad News : सापाचा दंश असल्याचे लक्षात आल्यानंतर घरातील मंडळींनी तिला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले

Rajesh Sonwane

सचिन कदम 
रायगड
: कोपऱ्यात असलेल्या सापाने सकाळी विवाहित तरुणीला दंश केला. यानंतर सदर तरुणीला (Raigad) घरच्यांनी लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना (Mangaon) माणगाव येथे आज घडली. मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. (Breaking Marathi News)

दानिया हर्णेकर असे मृत मुलीचे नाव आहे. दानिया सकाळी काम करत असताना विवाहित तरुणीला सापाने दंश केला. काही तरी चावल्याचे जाणवले. सापाचा दंश (Snake Bite) असल्याचे लक्षात आल्यानंतर घरातील मंडळींनी तिला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २४ वर्षीय दानिया या विवाहीतेचा मृत्यु झाला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ 

सर्पदंश झाल्यानंतर लगेचच मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र वेळोवेळी सांगुन देखील योग्य तपासण्या आणि उपचार न केल्याने मुलीचा मृत्यु झाला असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत मृत मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला आहे. तसेच माणगाव पोलिस रुग्णालयात दाखल झाले असुन मृतदेह रुग्णवाहिकेत ठेऊन नातेवाईक डॉक्टरांवर कारवाईची मागणी करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KBC 18: 'ट्रेनिंगमध्ये साप खावे लागतात...'; CRPF कमांडेंटचा बिग बॉसमध्ये मोठा खुलासा

Maharashtra News Live Update: पेणमध्ये दिव्यांग मुलांनी फोडली दहीहंडी; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

Salman Khan: 'हे तुझं काम नाही..'; बिग बॉस २०च्या प्रीमियर शूटिंगदरम्यान सलमान खान संताप, व्हिडिओ व्हायरल

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत

Pune News: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, डीजे प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT