Mangaon News SAAM TV
महाराष्ट्र

Mangaon News : आदल्या दिवशी इमारतीत रक्ताचा सडा, दुसऱ्या दिवशी फ्लॅटमध्ये भयंकर घडलं; घटनेचे गूढ वाढले

Raigad Mangaon News : रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये एका इमारतीच्या टेरेस, पायऱ्या आणि पार्किंगच्या परिसरात रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले होते.

Saam TV News

सचिन कदम

Raigad Mangaon News : रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये एका इमारतीच्या टेरेस, पायऱ्या आणि पार्किंगच्या परिसरात रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले होते. या घटनेचे गूढ कायम असतानाच आता याच इमारतीतील एका फ्लॅटमध्ये भयंकर घटना घडली आहे.

माणगाव शहरातील उतेखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारा इमारतीतील एका फ्लॅटमध्ये एका ३४ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. फ्लॅटमध्ये त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. बुधवारीच या इमारतीच्या टेरेस आणि पायऱ्या तसेच पार्किंगच्या परिसरात रक्ताचे डाग आढळून आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी निवारा इमारतीमध्ये ३४ वर्षीय राजेंद्र जाधव या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज, गुरुवारी उघडकीस आली आहे. शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा फोडल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

बुधवारी याच इमारतीच्या टेरेससह पायऱ्या आणि परिसरात सर्वत्र रक्ताचे डाग आढळून आले होते. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. पोलीस तपासातही काहीच हाती लागलं नव्हतं. या घटनेचा तपास सुरू असतानाच, आता तरुणाचा फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आल्याने गूढ आणखीनच वाढले आहे.

ते गूढ कायम

इमारतीच्या टेरेस आणि परिसरात रक्ताचे डाग आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. रक्ताचे नमुने घेऊन पोलिसांनी आजूबाजूला चौकशीही केली. पण काही माहिती हाती लागू शकली नव्हती. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने काही ठोस माहितीही हाती लागू शकली नाही. त्यात आता ही घटना उघडकीस आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदल्याची आग! जामिनावर बाहेर आला अन् अडकला ट्रॅपमध्ये, शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा रक्तरंजित थरार

Refrigerator placement: फ्रिज खिडकीजवळ ठेवावा की भिंतीजवळ? तुमच्या घरी कुठे आहे, वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा

Maharashtra News Live Update: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणीला सुरुवात

Pune Crime: पुणे हादरले! तरुणावर प्राणघातक हल्ला, कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; १० हजारांचे तिकीट काढून घुसले अन् ४.३ लाखांची केली चोरी

SCROLL FOR NEXT