raigad news How was explosion in Mahad MIDC company worker told shocking the incident  Saam TV
महाराष्ट्र

Mahad MIDC Blast: स्फोट भयंकर होता, आम्ही जीव मुठीत घेऊन बाहेर पळालो, पण... तरुणाने सांगितला भयानक प्रसंग

Satish Daud

सचिन कदम, साम टीव्ही

Raigad's Mahad MIDC Blast News

रायगड जिल्ह्यात शुक्रवारी दुपारसच्या सुमारास एक भयानक घटना घडली. महाड एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काही कामगार जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, हा स्फोट नेमका कसा झाला? याबाबत एका कामगाराने माहिती दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरुणाने सांगितला धडकी भरवणारा प्रसंग

कंपनीच्या ज्या प्लांटमध्ये हा स्फोट झाला, त्या ठिकाणी २५ ते ३० कामगार काम करीत होते. या प्लांटमध्ये पावडर ड्राइंगचे काम केले जात होते. दुपारच्या सुमारास कामगार काम करत असताना तिथे अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की मोठा आवाज झाला. काही कळण्याच्या आत सर्व गॅस बाहेर आला. (Latest Marathi News)

प्लांटमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी जीवाच्या आकांताने बाहेर धाव घेतली. मी देखील त्यांच्यासोबत बाहेर पडलो. मात्र, आमच्यासोबत काम करणाऱ्या काही कामगारांना बाहेर पडता आले नाही. कदाचित गॅसमुळे ते बेशुद्ध झाले असावे, असा थरकाप उडवणारा प्रसंग स्फोटातून वाचलेल्या कामगाराने सांगितला.

दरम्यान, या स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कंपनीत अडकलेल्या काही कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही काही कामगार प्लांटमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

SCROLL FOR NEXT