Raigad News: Saamtv
महाराष्ट्र

Raigad News: कसली ही मस्ती! रुम न दिल्याने लॉज मालकाला मारहाण, स्कॉर्पिओखाली चिरडून बहिणीचा जीव घेतला

Raigad Tourist Clashes News: भाड्याने रुम न दिल्याने पर्यटकांनी लॉज चालकाला मारहाण करत त्याच्या बहिणीला गाडीखाली चिरडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Gangappa Pujari

सचिन कदम, रायगड: रायगडच्या हरीहरेश्र्वर येथे मद्यधुंद पर्यटकांनी धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाड्याने रुम न दिल्याने पर्यटकांनी लॉज चालकाला मारहाण करत त्याच्या बहिणीला गाडीखाली चिरडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी कि, पुणे येथील अकरा पर्यटक एक स्कार्पिओ भरून यावेळी हरिहरेश्वर येथील अभि धामणस्कर यांच्या ममता होम स्टे येथे राहण्याच्या चौकशीसाठी आले होते. हे सर्व पर्यटक अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होते. धामणस्कर यांनी रूम दाखवल्यानंतर भाडे ठरवताना मालकाच्या लक्षात हे सर्व अत्यंत दारू प्यायलेले आहेत. त्यामुळे त्यांनी रुम देण्यास नकार दिला तसेच दुसऱ्या ठिकाणी रुम बघण्यास विनंती केली.

याच रागातून गाडीतील एकाने धामणस्कर यांना कानाखाली लगावली व पळून गेले. मात्र त्यातील एकजण बाहेर उतरला असल्याने त्यांना स्थानिकांनी कॉल करून बोलावून घेतले. यावेळी ते तरुण परत आल्यानंतर त्यांनी गाडी पार्क करण्याच्या उद्देशाने लावली आणि कारमधून बाहेर न पडता, गाडी मागे घेण्याच्या बहाण्याने अभि धामणस्कर यांची बहिण ज्योती धामणस्कर यांना चिरडले. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर गाडीतील तरुणांनी गाडीसह पळ काढला तर एकजण स्थानिकांच्या हाती लागला. इराप्पा धोत्रे असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे आणि अक्षय गायकवाडसह इतर साथीदार पळून गेले. या प्रकारानंतर परिसरात स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत माहिती दिली असून सध्या अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT