Mahad Breaking News Saamtv
महाराष्ट्र

Mahad News: महाडमध्ये ठाकरे - शिंदे गट आमने सामने! स्मृतिदिनाच्या कार्यक्रमावरुन जोरदार राडा; नेमकं काय घडलं?

Mahad Shivsena Thackeray Group Vs Shinde Group: पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

सचिन कदम, प्रतिनिधी

Mahad Shivsena Dispute:

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. रायगडच्या महाडमध्येही असाच प्रकार समोर आला असून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमावरुन दोन्ही गटात जोरदार राडा झाला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाडमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले असून दोन्ही गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी चौकामध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम घेण्यावरुन या वादाला सुरूवात झाली.

यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून नवे- जुने, गद्दार, निष्ठावंत म्हणत हायहोल्टेज ड्रामा झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत असून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवाजी पार्कमध्येही जोरदार राडा..

दरम्यान, शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी हा वाद झाला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

SCROLL FOR NEXT