AAP Saam tv
महाराष्ट्र

AAP: ‘आप’च्या झाडूने पंजाबात काँग्रेस, भाजप सपाट; अलिबागमध्ये विजयाचे पेढे

‘आप’च्या झाडूने पंजाबात काँग्रेस, भाजप सपाट; अलिबागमध्ये विजयाचे पेढे

साम टिव्ही ब्युरो

रायगड : पाच राज्याच्या मतमोजणीत पंजाबच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला स्पष्ट बहुमत दिले. आपच्या झाडूने काँग्रेस आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. पंजाबमधील आपच्या या विजयाने अलिबागमधील (Alibag) कार्यकर्त्यांनी पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. (raigad news AAP's victory in Punjab after election result Victory sweet in Alibag)

अलिबाग शहरातील एसटी स्थानक परिसरात आपच्या (AAP) कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटले. यावेळी पंजाबच्या (Panjab) मतदाराचे आपच्या पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले. आपचे जिल्हाध्यक्ष मनोज घरत, ऍड. अजय उपाध्ये, पिके सुनीलकुमार, श्रीकांत शिंदे, संदीप घाडी, दिलीप जोग यावेळी या विजयोत्सवात सहभागी झाले होते. गोव्यात (Goa) ही आपने खाते खोलले असून दोन उमेदवार विजयी झाले आहेत.

पंजाबमध्ये आप पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आपचे 90 उमेदवार विजयी झाले आहेत. सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाला 18 तर भाजपला 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे खरे हिरो आजच्या निकालानंतर ठरले आहेत. गोवा राज्यातही आपने दोन उमेदवार जिंकून मुसंडी मारली आहे. आपच्या माध्यमातून दिल्लीच्या धर्तीवर विकास पंजाबमध्ये होणार असल्याचे या निकालानंतर स्पष्ट होत आहे. मतदारांनी काँग्रेस आणि भाजपला नाकारून आपला पसंती दिल्याने आपसाठी हा मोठा विजय मानला जात आहे. महाराष्ट्रातही बदल घडविण्यासाठी मतदारांनी आम्हाला साथ द्या असे मत दिलीप जोग यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT