Raigad : नगरसेवक असावा तर डॉ.मुईज शेखसारखा!
Raigad : नगरसेवक असावा तर डॉ.मुईज शेखसारखा! SaamTvNews
महाराष्ट्र

Raigad : नगरसेवक असावा तर डॉ.मुईज शेखसारखा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत वार्ड नंबर 9 मधून काँग्रेसचे डॉ.मुईज शेख हे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून निवडून आले. निकाल लागून दोन दिवस होत नाहीत तोच नगरसेवक डॉ.मुईज शेख हे आपल्या वार्डात फिरून समस्या सोडविण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

हे देखील पहा :

वार्डातील पाणी, स्मशानभूमी समस्या तसेच वार्ड मधील गरीब, निराधार मुलाचा शिक्षणाचा खर्च स्वतः उचलणार आहेत. तर विधवांना पेन्शन मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे वार्डातील (ward) समस्या सोडविण्यासाठी असाच सक्षम नगरसेवक निवडून दिल्याबाबत मतदारांकडून डॉ.मुईज शेख यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

रायगड (Raigad) जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून 19 जानेवारी रोजी निकालही जाहीर झाला. म्हसळा नगरपंचयत ही राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसकडे गेली आहे. काँग्रेसचे (Congress) दोन नगरसेवक निवडून आले आहेत. वार्ड नंबर नऊ मधून डॉ. मुईज शेख हे विजयी झाले आहेत. त्यामुळे मतदाराचे त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी निवडून येताच डॉ.शेख यांनी प्रशासनाच्या मंजुरीची वाट न पाहता जातीने स्वखर्चाने समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे डॉ.शेख यांनी केलेले आश्वासने किती दिवसात पूर्ण करणार याकडे मतदाराचे लक्ष लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT