Mahad MIDC News Saam Digital
महाराष्ट्र

Mahad MIDC News: महाड MIDC स्फोट, ७ जणांचे मृतदेह सापडले, ४ जण अद्यापही बेपत्ता

Mahad MIDC News: रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत ७ कामगारांचे मृतदेह हाती लागले आहेत. मात्र, ४ जण अजूनही बेपत्ता आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mahad MIDC News

रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत ७ कामगारांचे मृतदेह हाती लागले आहेत. मात्र, ४ जण अजूनही बेपत्ता आहेत. एनडीआरएफ टीम आणि हेल्थ फाऊंडेशनकडून बचावकार्य अद्याप सुरू आहे. स्फोटात कंपनीचे बांधकाम कोसळल्यामुळे आणि ज्वलनशिल रसायने असल्याने वेल्डींग, कटींग मशिनचा वापर करता येत नाही. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना कंपनीकडून30 लाख, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच विमा कंपन्यांकडून मदत मिळणार असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाड एमआयडीसीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत शुक्रवारी सकाळी सलग सात स्फोट झाले होते. सकाळी १० वाजता पहिला स्फोट झाला होता. त्यानंतर स्फोटांची मालिका सुरू झाली. सायंकाळपर्यंत जवळपास २०-२५ स्फोट झाले. यात ७ कामगार जखमी झाले होते. तर ११ जण बेपत्ता होते. त्यातील ७ जणांचे मृ्तदेह हाती लागले आहेत.

दरम्यान हा स्फोट इतका भयंकर होता की कंपनीमध्ये क्षणार्धात आग लागली. अग्निशमनच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तब्बल ५ तासानंतर आग आटोक्यात आणली होती. जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अद्यापही ४ कामगार बेपत्ता आहेत. एनडीआरएफच्या जवानांकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. हेल्थ फाऊंडेश, पोलीस प्रशासनाकडूनही बचावकार्यात मदक करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून पोस्टरबाजी

Gold Price : दसऱ्याच्या आधीच सुवर्ण झळाळी; सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढ

Politics : काँग्रेसचा 'पायलट' प्रोजेक्ट! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन राज्यांत मोठी उलथापालथ होणार

Pakistan Cricket Team : आशिया कपमध्ये पराभूत झाल्यानंतर पीसीबीचा महत्वाचा निर्णय; पाकिस्तानी खेळाडूवर मोठी कारवाई

Pandharpur : पंढरपुरात रेशन धान्याचा काळाबाजार; शिवसेना पदाधिकाऱ्यांची धाड, कारवाईस टाळाटाळ

SCROLL FOR NEXT