MLA Mahendra Thorve addressing the media after revealing the Beed connection in the Khopoli murder case. saam tv
महाराष्ट्र

Mangesh Kalokhe Death Case: खोपोली हत्याकांड प्रकरणाच बीड कनेक्शन? मंगेश काळोखेंचा एक हत्यारा वाल्मीक कराड गँगचा मेंबर

Khopoli Killing Case: खोपोली हत्याकांडात आमदार महेंद्र थोरवे यांनी बीड कनेक्शन उघड केलाय. हल्लेखोरांपैकी एक जणाचा वाल्मीक कराड टोळीशी संबंध असल्याचा आरोप आमदारांनी केलाय. ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.

Bharat Jadhav

  • खोपोली हत्याकांड प्रकरणात बीड कनेक्शन उघड

  • वाल्मिक कराड गँगशी संबंधित आरोपीचा सहभाग

  • आमदार महेंद्र थोरवे यांनी केला धक्कादायक खुलासा

सचिन कदम, साम प्रतिनिधी

खोपोली येथील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. मंगेश काळोखे हत्याकांडाच बीड कनेक्शन उघड झालंय. आमदार महेंद्र थोरवे यांनी हे बीड कनेक्शन उघड केलंय. मुख्य आरोपी रवी देवकर याचा बॉडीगार्ड हा बीडचा असून त्याने मंगेश काळोखेवर १९ वार केले. तो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या गृपमधील असल्याचा धक्कादायक खुलासा थोरवे यांनी केलाय.

खोपोली नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी निघृण हत्या झाली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरवून सोडलं होतं. मंगेश हे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक होते.या हत्येच्या प्रकरणात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात सुधाकर घारे हे खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागलंय.

खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये मानसी काळोखे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या उर्मिला देवकर उभ्या होत्या. उर्मिला देवकर यांचा ७०० पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. या पराभवाचा राग आणि राजकीय वैमनस्यातून मंगेश काळोखे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.आता या हत्येचं बीड कनेक्शन समोर आले आहे. स्वत: आमदार थोरवे यांनी यांनी हे कनेक्शन उघड केले आहे.

या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी रवी देवकर याचा बॉडीगार्ड बीडचा असून त्याने मंगेश काळोखेवर १९ वार केले होते. तो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या गृपमधील असल्याचा धक्कादायक खुलासा थोरवे यांनी केलाय. देवकरचा बॉडीगार्डचे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासोबत फोटो व्हायरल झालेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो असल्याचे देखील थोरवे यांनी स्पष्ट केलंय. उद्या सोमवारी संध्याकाळी खोपोली पोलीस ठाण्यावर कँडल मार्च काढून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली जाणार आहे तर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलनाचा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT