Irshalgad Landslide Saam TV
महाराष्ट्र

Irshalgad Landslide: माझ्या मुलीला शोधायला आलोय; ८५ वर्षीय बापाचं हृदय लेकीसाठी तुटतंय, इर्शाळवाडीत दुसऱ्या दिवशीही चालत पोहोचले

Irshalwadi Landslide News: रात्री झालेल्या दुर्घटनेनंतर प्रत्येक जण इथे आपल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी येत आहे.

Ruchika Jadhav

Raigad Irshalgad Landslide News Today: इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री गाढ झोपेत असताना इर्शाळवाडीवर निसर्ग कोपला. या दुर्घटनेत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाल्याचं समजलं आहे. रात्री झालेल्या दुर्घटनेनंतर प्रत्येक जण इथे आपल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी येत आहे. (Latest Raigad Irshalwadi News)

मोठ मोठ्या किंकाळ्या, आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावल्यानं आक्रोश करणारे चेहरे ही सर्व दृश्य काळजात घर करणारी आहेत. इथे कुणी आपल्या मुलांना शोधायला आलंय, तर कुणी आपल्या आपल्या भावंडांना आणि आई-वडलांना. सापडलेला मृतदेह आपल्याच व्यक्तीचा आहे का? हे पटवताना येथील लोकांच्या पोटात गोळा येतोय.

या सर्वांमध्ये एक आजोबा आपल्या लेकीला शोधण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेत. डोंगराचा सर्व चिखल आणि त्यात हे ८५ वर्षांचे आजोबा आपल्या मुलीला शोधण्यासाठी धडपडत आहेत. लता असं त्यांच्या मुलीचं नाव. लता यांचं लग्न झालं असून त्या आपल्या पती आणि ५ मुलांसह इर्शाळवाडीत राहत होत्या.

डोंगर खचल्यानंतर या थकलेल्या बापाचे डोळे कालपासून इर्शाळवाडीत आपल्या लेकीला शोधत आहेत. आपल्या मुलीच्या ५ मुलांपैकी ३ मुलं शाळेत असल्याने ती वाचली आहेत असं आजोबांनी सांगितलंय. १ दिवस उलटून गेलाय. आतापर्यंत १७ जणांचे मृतदेह बाहेर काढलेत. या हृदयद्रावक परिस्थितीतही एक बाप आपल्या लेकीला शोधत आहे.

वरुन धोधो पाऊस, या पावसापासून वाचण्यासाठी डोक्यावर प्लास्टिकचा तुकडा, डोळ्याला चष्मा अन् हातात काठी घेत थकलेले आजोबा आपल्या मुलीला नातवंडांना पाहण्यासाठी आतुर झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voting Ink: मतदानाला वापरली जाणारी शाई कुठून येते? कशापासून बनवली जाते? जाणून घ्या A to Z माहिती

Palghar : पैसे वाटपावरुन ठाकरे आणि शिंदे गटामध्ये राडा, ऐन थंडीत पालघरमधील राजकीय वातावरण तापले!

Bank Loan Interest: कर्जावरील व्याजदर कमी होणार? जास्त व्याजदर आकारणाऱ्या बँकांना सरकारचा सल्ला, म्हणाले...

Mahalakshmi Yog: उद्यापासून 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; महालक्ष्मी योगामुळे होणार धनलाभ

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

SCROLL FOR NEXT