Aditi Tatkare Bharta Gogawale Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंची पालकमंत्रिपदाची इच्छा अधुरी, आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री

Raigad Guardian Minister Aditi Tatkare : नुकतीच राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आले.

Yash Shirke

Raigad Guardian Minister : राज्यातील जिल्ह्याचे पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झालीय. अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचं पालकमंत्री पद देण्यात आले आहे.तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आले आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद गेले आहे. मंत्रिपदासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती तशीच शर्यत पालकमंत्रिपदासाठी होती. आज अखेर पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला असून यादी जाहीर करण्यात आलीय.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु झाली होती. नुकतीच राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्रींची यादी जाहीर झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे आणि बीड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली.

शिवसेनेचे भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. तर वडिलांच्या वारसामुळे आदिती तटकरे पालकमंत्रिपदासाठी संभाव्य उमेदवार होत्या. तेव्हा एका प्रकारे, रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात चढाओढ होती. ते दोघेही राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. तेव्हा दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मागील काही दिवसांपासून पालकमंत्रिपदावरुन सुरु असलेला तिढा सुटला. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन अनेक वाद, चर्चा सुरु होत्या. धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होतील असे सुरुवातीला वाटत होते. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांचे नाव पुढे आले. त्यांना जिल्ह्यातून प्रचंड विरोध झाला. त्यामुळे धनंजय मुंडे यांना वगळून अजित पवारांनी स्वत:कडे बीडचे पालकमंत्रिपद घेतले, असे म्हटले जात आहे.

पालकमंत्रिपदाची यादी -

१. गडचिरोली - देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मुख्यमंत्री

२. ठाणे - एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, उप. मुख्यमंत्री

३. मुंबई शहर- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे,

४. पुणे -अजित आशाताई अनंतराव पवार, उप. मुख्यमंत्री

५. बीड - अजित आशाताई अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री

६. नागपूर- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

७. अमरावती- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

८.- अहिल्यानगर - राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील

९. वाशिम- हसन सकिना मियालाल मुश्रीफ

१०. सांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील

११. नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन

१२. पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक

१३. जळगांव - गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील

१४. यवतमाळ - संजय प्रमिला दुलिचंद राठोड

१५. मुंबई उपनगर - अ‍ॅड. आशिष मिनल बाबाजी शेलार, मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा (सह-पालकमंत्री)

१६. रत्नागिरी- उदय स्वरुपा रविंद्र सामंत

१७. धुळे -जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल

१८ जालना- पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे

१९. नांदेड - अतुल लिलावती मोरेश्वर सावे

२०. चंद्रपूर- डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके

२१. सातारा- शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई

२२. रायगड - कु. आदिती वरदा सुनिल तटकरे

२३. लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले

२४. नंदूरबार- अ‍ॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे

२५. सोलापूर -जयकुमार कमल भगवानराव गोरे

२६. हिंगोली - नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ

२७. भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे

२८. छत्रपती संभाजीनगर - संजय शंकुतला पांडुरंग शिरसाट

२९. धाराशिव - प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक

३०. बुलढाणा - मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)

३१. सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणे

३२. अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर

३३. गोंदिया -बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील

३४. कोल्हापूर श्रीमती माधुरी मीरा सतिश मिसाळ (सह-पालकमंत्री)

३५. गडचिरोली अ‍ॅड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल (सह-पालकमंत्री)

३६. वर्धा डॉ. पंकज कांचन राजेश भोयर

३७. परभणी मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांचे नाव श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT