Waghya Dog Controversy Saam tv
महाराष्ट्र

Waghya Dog Controversy : छत्रपती शिवरायांच्या चितेत वाघ्या कुत्र्याने उडी मारली होती? इतिहास अभ्यासकांचं म्हणणं काय?

Waghya Dog Controversy News : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. तर काहींनी या मागणी विरोध केला आहे. तर काहींनी समर्थन दिलं आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात उल्लेख नसल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी संभाजीराजेंनी केली आहे. शिवकालीन इतिहास आणि दस्तावेजामध्ये वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नसल्याच्या माहिती इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दुजोरा दिला आहे.

माजी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वाघ्याची समाधी हटवण्याची मागणी केली. २२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ३१ मेपर्यंत समाधी हटवण्याची विनंती केली आहे. माजी खासदार संभाजीराजेंच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

इतिहास अभ्यासक काय म्हटले?

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी म्हटलं की, 'रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे कल्पित स्मारक आहे. वाघ्या कुत्र्याची इतिहासात कुठलीही नोंद नाही. इतिहासात आणि दस्तावेजामध्ये या वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवन चरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही'.

'वाघ्या कुत्र्याचं स्मारक करून छत्रपती शिवाजी महाराज यांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न आहे. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली आहे. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी केलेली मागणी योग्यच आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे. वाघ्या कुत्र्याची गोष्ट खोटी असल्याची दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.

वाघ्या कुत्रा समाधीच्या समर्थनार्थ काही शिवप्रेमींचं प्रांताधिकाऱ्यांना पत्र

किल्ले रायगडावरील समाधीच्या मागे असलेली कुत्र्याची समाधी आणि पुतळा काढून टाकण्याचे पत्र माजी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. या पत्राला महाडमधील शिवप्रेमींनी आव्हान दिलं आहे. ही कुत्र्याचं शिल्प, समाधी आम्ही लहानपणापासून पाहत आहोत. कोणी ते काढण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही त्याला विरोध करू, तिथे जाऊ देणार नाही, अशी भूमीका येथील शिवप्रेमींनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT