Police investigating the Raigad murder case where a woman, her lover, and a friend allegedly killed her husband after a social media affair. Saam tv
महाराष्ट्र

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

Raigad Crime Wife Killed Husband For Lover: रायगडच्या नागोठणे भागातून एक धक्कादायक खुनाची घटना घडली आहे. एका महिलेने तिचा प्रियकर आणि मित्राच्या मदतीने पतीचा खून केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे आणि तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

  • नागोठणे येथे एका महिलेने पतीचा खून केलाय.

  • पत्नी, प्रियकर आणि मैत्रीण यांनी मिळून पतीच्या हत्येचा कट रचला.

  • आरोपींविरुद्ध नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सचिन कदम, साम प्रतिनिधी

सध्या विवाहबाह्य संबंधातून हत्येचा घटना होत आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथेही अशीच एक घटना घडल्याचं समोर आले आहे. सोशल मिडियावर भेटलेल्या व्यक्तीच्या प्रेमात अंधळ्या झालेल्या एका महिलेने आपल्या नवऱ्याची हत्या केली आहे. नवऱ्याची हत्या करण्यासाठी महिलेला तिची मैत्रिण तिच्या प्रियकराने साथ मिळाली. या तिघांनी कट रचत हा हत्येचा गुन्हा केला.

हाती आलेल्या माहितीनुसार, कृष्णा नामदेव खंडवी वय वर्ष 23 राहणार पाबळ तालुका पेण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत कृष्णा याच्या पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने कट रचत पती कृष्णाची हत्या केली. याप्रकरणी आरोपी पत्नी दिपाली अशोक निरगुडे, प्रियकर उमेश सदु महाकाळ आणि त्यांची मैत्रीण सुप्रिया चौधरी यांच्या विरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कृष्णा याची पत्नी दिपाली आणि उमेश यांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. परंतु त्यांच्या प्रेमात पती कृष्णा अडचण वाटू लागला. त्यामुळे पत्नी दिपाली आणि उमेशच्या डोक्यात कृष्णाला संपवण्याचा डाव शिजून लागला. कृष्णाला आपल्या वाटेतून कसं कायमचं बाजुला करायचं यासाठी ते कट आखू लागले. कृष्णाची हत्या करण्यासाठी त्यांनी सुप्रिया चौधरी नावाच्या मैत्रिणीची मदत मागितली. त्यानंतर सुप्रियाने कृष्णाचा खून करण्यासाठी त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.

त्यासाठी सुप्रियाने सोशल मीडियावर बनवाट अकाउंट बनवलं. त्यातून तिने कृष्णाशी संपर्क साधला. त्याच्याशी मैत्री वाढून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. कृष्णाला मारण्याचा प्लॅन ठरल्यानंतर सुप्रियाने पेण येथून नागोठणे येथे कृष्णाला बोलवले. नागोठणे येथील वरसगावच्या डोंगर भागात निर्जन स्थळी नेत कृष्णाची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर केमिकल टाकले. मयत कृष्णाचा मोबाईल फोडून तो फेकून दिला. दरम्यान या हत्याप्रकरणी पोलिसांनी तपास करत तिघां आरोपींना अटक केली आहे. तर नागोठणे पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT