Crime News : महिलेने दागिने पॉलिश करायला दिले अन् गंडा बसला! SaamTvNews
महाराष्ट्र

Crime News : महिलेने दागिने पॉलिश करायला दिले अन् गंडा बसला!

उजाळा कंपनीच्या जाहिरातीच्या नावाखाली तांबे, पितळ, सोने चमकवून देतो असे सांगून एका महिलेला दोन ठकांनी साठ हजाराचा सोन्याचा ऐवज लंपास करून पोबारा केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- राजेश भोस्तेकर

रायगड : उजाळा कंपनीच्या जाहिरातीच्या नावाखाली तांबे, पितळ, सोने चमकवून देतो असे सांगून एका महिलेला दोन ठकांनी साठ हजाराचा सोन्याचा ऐवज लंपास करून पोबारा केला. त्यामुळे दागिने पॉलिश करायला दिले आणि डोक्यावर हात मारण्याची वेळ रोहा शहरातील एका महिलेवर आली आहे. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात अनोळखी दोन ठकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे घरात प्रभोलन दाखविणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या हातात आपल्या मौल्यवान वस्तू देऊ नका असे आवाहन रोहा पोलिसांनी केले आहे.

हे देखील पहा :

रोहा शहरातील अंधार आळी येथील भवानी प्लाझा इमारतीत राहणाऱ्या फसवणूक झालेल्या महिलेकडे दुपारच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती आल्या होत्या. घरात महिला ही एकटीच होती. या अनोळखी व्यक्तींनी उजाळा कंपनीच्या पावडरची जाहिरात करण्यासाठी आलो आहोत. या पावडरने घरातील तांबे, पितळ भांडी, सोन्याचे दागिने उजळून निघतात असे सांगितले. तुमची देवाची भांडी, दागिने तुमच्यासमोर पॉलिश करून देतो असे सांगितले. फसलेल्या महिलेने त्याच्या बोलण्यात फसून 59 साठ हजार किमतीचे मंगळसूत्र आणि कानातील टॉप हे सोन्याचे दागिने पॉलिश करण्यास दिले.

दागिने स्वच्छ करण्याचा बहाणा करून दागिने गॅसवर भांड्यात गरम पाण्यात ठेवून त्यात हळद टाकून ठेवले व दहा ते पंधरा मिनिटांनी स्वच्छ होतील असे सांगत त्यांनी हात चलाखीने दागिने लंपास केले. आणि दोघांनी पोबारा केला. पंधरा मिनिटांनी महिलेने गॅसवर ठेवलेले भांड्यातील दागिने पाहिले असता आपण फसले गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर महिलेने रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून अनोळखी दोघा ठका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT