महाराष्ट्र

Raigad Crime: घरात एकटी असल्याचे पाहून घुसला, १० वर्षीय मुलीवर बलात्कार; रायगड हादरले

Maharashtra News: रायगड जिल्ह्यातील वरंध गावात अल्पवयीन १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीवर POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Dhanshri Shintre

  • रायगडच्या वरंध गावात १० वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आली.

  • आरोपी सचिन पांडुरंग सुतार (३७) विरोधात भारतीय न्याय संहिता व POCSO अंतर्गत गुन्हा दाखल.

  • मुलीची आई मजुरीला गेल्याने मुलगी घरी एकटी होती, त्याचा आरोपीने गैरफायदा घेतला.

  • घटनेनंतर गावामध्ये संताप असून कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

रायगड जिल्ह्यातील वरंध येथे अल्पवयीन १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिडीत मुलगी घरात एकटी असताना आरोपीने या संधीचा गैरफायदा घेत हा गंभीर गुन्हा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचे वडील गावी गेले होते तर आई मजुरीसाठी बाहेर गेल्यामुळे मुलगी घरी एकटी होती. त्याचवेळी आरोपी सचिन पांडुरंग सुतार, वय वर्ष ३७, वरंध येथे राहणाऱ्या पुरुषाने पाण्याचा बहाणा करून मुलीला फसवले. घरात कोण नसल्याचे पाहून आरोपी तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बळजबरी केली. घरी परतल्यानंतर आईला मुलीकडून या घटनेची माहिती मिळाली. मुलीच्या आईने तातडीने महाड MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या गंभीर प्रकाराबाबत प्रकरण नोंदवण्यात आले असून आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित तरतुदीखाली तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

या भयानक घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहेत. स्थानिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मागणी केली आहे. गावकऱ्यांमध्ये संताप असून समाजात वाढत चाललेल्या अशा घटनांवर त्वरीत आणि कठोर शिक्षा व्हावी ही मागणी सर्वत्र होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

SCROLL FOR NEXT