Raigad Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

Raigad Crime: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर मित्रानेच बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More
  • रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  • मित्रासह आणखी एका तरुणाचं भयंकर कृत्य

  • पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला

सचिन कदम, रायगड

रायगडमध्ये १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मित्रानेच या मुलीचा घात केला आणि तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले. आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या मुलीवर चार वेळा बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाच्या मित्राने देखील या मुलीचा फायदा घेत तित्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे रायगड हादरले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या म्हसळ्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीला आरोपीने ऑफिस, धबधबा, जंगल, अंडर कंस्ट्रक्शन बिल्डींग, मित्राची रुम अशा विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी तरुणाने सुरूवातीला पीडितेसोबत मैत्री केली.

मैत्रीदरम्यान आरोपीने पीडितेवर प्रेम असल्याचे सांगत आणि लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने एकदा नाही तर अनेक वेळा पीडितेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या मित्राने देखील पीडित मुलीचा फायदा घेतला. त्याने देखील पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. दोनन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते फरार आहेत. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

ताम्हिणी घाटात महिलेची हत्या -

रायगडच्या ताम्हिणी घाटात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह दरीत फेकून देण्यात आला. घाटात ५० फूट खोल दरीतून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह रेस्क्यू टीम आणि स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. माणगाव पोलिस आणि तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Fire: मारवाडी गल्लीतील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या विळख्यात; दोन जणांचा मृत्यू

Tuesday Horoscope: मन प्रसन्न राहील! ५ राशींच्या व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

SCROLL FOR NEXT