Raigad School Bus Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Raigad Bus Accident: सहलीला निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली; दोघांचा जागीच मृत्यू, ५५ प्रवासी जखमी

Satish Daud

Raigad School Bus Accident News

रायगडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ५७ प्रवाशांना घेऊन सहलीला निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह बचावपथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस पुण्याहून कोकणाकडे सहलीसाठी निघाली होती. या बसमधून ५७ प्रवासी प्रवास करीत होते. शनिवारी पहाटे बस माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हिणी घाटात (Raigad Bus Accident) आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात बस घाटात उलटली.

अपघात इतका भीषण होता, की यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ५५ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. कोंडेघर गाव हद्दीतील नागरिकही बचावकार्यास पुढे सरसावले.

दरम्यान, अथक प्रयत्नानंतर बसमध्ये (Bus Accident) अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.

ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटली असल्याचे बोलले जात आहे. अपघातातील मृतांची नावे अद्यापही समोर आलेली नाही. सहलीला निघालेल्या बसचा गेल्या आठवडाभरातील हा दुसरा अपघात आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT