raigad, High Alert In Raigad saam tv
महाराष्ट्र

Raigad boat News : रायगडमध्ये सापडलेली बोट कुठून आली? समोर आली मोठी अपडेट

ही बोट कुठून आली याबाबतची अपडेट समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Raigad boat : रायगड (Raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आज दुपारी एक संशयास्पद बोट आढळून आली. या बोटीत तीन एके-४७ सह तब्बल १० बॉक्स आढळून आले. याव्यतिरिक्त हरिहरेश्वर येथेही एक लहान बोट आढळून आली. या बोटीत (boat) लाईफजॅकेट तसेच इतर साहित्य सापडले. या बोटीत शस्त्रे आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जाहीर करण्यात आला.

दरम्यान, ही बोट कुठून आली याबाबतची अपडेट समोर आली आहे. आढळून आलेली बोट ही एक ऑस्ट्रेलियन बोट असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात दिली. या बोटीचे नाव लिडिहान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉंडरर्स गन या महिलेची आहे. तिचे पती जेम्स हार्बट हे सदर बोटीचे कप्तान असून ही बोट मसकत येथून युरोपकडे जाणार होती.

26 जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि बोटीवर असलेल्या खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. दुपारी १ वाजेच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केले.

समुद्र खवळलेला असल्याने लेडीहान या बोटीचे टोईंग करता आले नाही. त्यानंतर समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकट ही नौका रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली. अशी माहिती भारतीय कोस्टगार्डकडून प्राप्त झाली. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ही बोटीची ओळख पटली असली तरी, राज्यातील महत्वाच्या शहरात मात्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे बोटीत काही शस्त्रास्त्रांचा साठादेखील सापडला. समुद्रामार्गे दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याची शक्यता पाहता, हा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. आज विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने अधिवेशनातदेखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबईसह राज्यातील समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

SCROLL FOR NEXT