Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

मिरजेच्या वड्डीत फर्माहाऊसवर छापा, अंमली पदार्थांचा साठा जप्त; पुणे सीमा शुल्क विभागाची कारवाई

एका फार्म हाऊसवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे.

विजय पाटील

सांगली - पुणे सीमा शुल्क विभागाकडून मिरज तालुक्यातल्या वड्डी याठिकाणी छापा टाकून लाखो रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. एका फार्म हाऊसवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. मिरज पुर्व भागातील वड्डी येथील एका फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने छापा टाकून अंमली पदार्थाचा साठा हस्तगत केल्याची समोर येत आहे. मात्र या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

हे देखील पाहा -

मिरजेतील एका उद्योजकाच्या फार्म हाऊसवर सांगली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने पुणे विभागीय केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकून अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. त्यानंतर उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र हा अंमली पदार्थांचा साठा नेमका किती आणि तो कोणाचा होता याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. दरम्यान थेट पुणे येथील केंद्रीय पथकाने अचानक छापा टाकून अंमली पदार्थांचा साठा जप्त केल्याने याबाबत शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT