Rahul Shewale rhea chakraborty saamtv
महाराष्ट्र

Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीला 44 फोन करणारा 'AU' कोण? शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा गौप्यस्फोट

या संपूर्ण प्रकरणाची थेट लोकसभेत चर्चा झाली असून त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता सुशांत सिंग राजपुत आत्महत्या प्रकरणाने राज्याचे राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या संपूर्ण प्रकरणाची थेट लोकसभेत चर्चा झाली असून त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनीही आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत.

लोकसभेत ड्रग्ज विषयावर चर्चा झाली असून यामध्ये अनेकांनी सुशांत सिंग राजपुत (Sushant Singh) प्रकरणाचा उल्लेख केला. तसेच बिहार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाची माहिती बाहेर आली नाही असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे.

काय म्हणाले राहुल शेवाळे?

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर सुशांत सिंग राजपुत प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. यावेळी ते म्हणाले की, "लोकसभेत ड्रग्ज या विषयावर चर्चा सुरू आहेत. या चर्चेत अनेकांनी भाग घेतला. चार ते पाच खासदारांनी सुशांतच्या केसचा उल्लेख केला. तोच विषय मी सभागृहात उपस्थित केला."

"सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी तपास केला. परंतु, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. ड्रग्जसंबंधात रियाची चौकशी करण्यात आली होती. सुशांत्या मृत्यूपूर्वी रियाला जे कॉल आले होते, त्यासंदर्भात बिहारच्या पोलिांच्या तपासात उल्लेख आहे."

याबद्दल पुढे बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, "या एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असल्याचे बिहार पोलिसांनी सांगितले आहे. याच एयू नंबर वरुन रिया चक्रवर्तीला ४४ कॉल आले होते. या एयूचा अर्थ अनन्या उदास असा सांगण्यात आला होता , मात्र एयू म्हणजेच आदित्य उद्धव असा आहे त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी."

राहुल शेवाळे यांच्या या आरोपानंतर शिवसेना (Shivsena) आमदार सुनील प्रभू यांनी "राहुल शेवाळे याचं डोकं ठिकाणावर नाही. राहुल शेवाळे हे भाजपच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. आज ते जे काही आहे नगरसेवक पासून ते खासदारकीपर्यंत हे त्यांना शिवसेना या चार अक्षरांमुळे मिळालं. असे आरोप करताना त्यांची जीभ कशी जड झाली नाही हा प्रश्न आहे," अशा शब्दात सडकून टिका केली आहे.

तसेच "मिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे व आदीत्य ठाकरेंना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकरणी सीबीआयने क्लिन चीट दिलेली असताना अशा प्रकारच्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही," असेही आमदार सुनिल प्रभू यांनी म्हणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुंड गजा मारणेला पुण्यात बंदी, जामीन मिळाला, पण... VIDEO

आधारकार्ड आता जन्मतारखेचा पुरावा नाही; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती ही पॉलिटिकल ऍडजेस्टमेंट

BJP MLA Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday Horoscope: आज महत्वाची कामे करताना सावधान, ५ राशींसाठी आनंदाचा दिवस, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT