Rahul Gandhi Saam Tv
महाराष्ट्र

Rahul Gandhi: राहुल गांधींचा तरुण नेत्यांना खास कानमंत्र, 2029 ची निवडणूक जेन-झींसोबत लढणार?

Rahul Gandhi On Gen-Z: राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. दोन वेळा त्यांनी महाराष्ट्र दौरा केला. नाशिक दौऱ्यात असताना त्यांनी नेत्यांना कानमंत्र दिल्याचं सांगितले जात आहे.

Rohit Kadam
  • राहुल गांधींची महाराष्ट्रातील तरुण नेत्यांसाठी नवी रणनीती

  • २०२९ निवडणुकीसाठी राहुल गांधींची जेन झीसोबत रणनीती

  • २०२९ ची निवडणूक जेन- झींसोबत लढवण्याची शक्यता

  • राहुल गांधींचा तरुण काँग्रेस नेत्यांना खास कानमंत्र

  • महाराष्ट्र काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्वाला संधी

महाराष्ट्र काँग्रेसनं तरुण नेतृत्वासाठी कंबर कसलीये. यासाठी राहुल गांधींनी नाशिक दौऱ्यात नेत्यांना कानमंत्र दिल्याचं बोललं जातंय. आगामी निवडणुकांसाठी राहुल गांधींनी कोणती नवी रणनीती आखलीये?... ही रणनीती गेमचेंजर ठरणार का?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

पेपरफुटी, शिक्षणव्यवस्था सुधारणा आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून जेन-झी चांगलीच आक्रमक झालीये. देशातील विविध राज्यांत तरुणाई रस्त्यावर उतरलीये. तर आपल्या न्याय हक्क आणि मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करताहेत. हा मुद्दा हेरून राहुल गांधींनी आपली रणनीती आखलीय आणि महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलंय.

गेल्या पंधरा दिवसांत महाराष्ट्राचा दुसरा दौरा करणाऱ्या राहुल गांधींनी नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, या भेटीआधी काँग्रेसच्या 69 जिल्हाध्यक्षांशी राहुल गांधींनी 'वन-टू-वन' चर्चाही केलीये. त्यामुळे काँग्रेसमध्ये निवडणूक रणनीतीत बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा सुरू आहे. नाशिकमधील काँग्रेसच्या शिबिरात राहुल गांधींनीच यासंदर्भात संकेत दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

तरूणाईची नवी फळी पुढे आणायची आहे. मानसिक, शारीरिक फिटनेस असलेले तरूण नेते संघटनेत पुढे राहतील. तरुणच भविष्यात आमदार, खासदार होतील. तरुणांनो फिजिकल, मेंटल, फायन्शियल फिटनेस वाढवा. स्थानिक प्रश्न हाती घेऊन जनतेत जा, असं राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, नाशिकमधील काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या शिबिरात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्यात आलं. त्यामुळे मानसिक, शारिरीक फिटनेस असलेले तरूण नेते संघटनेत पुढे राहतील, अशी भूमिका काँग्रेसनं घेतलेली दिसतेय. राहुल गांधींनी आधीच छात्रों की गूंज कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आपलं मत मांडण्यासाठी नवं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. यातला एक कार्यक्रम राहुल गांधींनी पुण्यात घेतला. त्यानंतर लगेचच नाशिकमध्ये शिबीर आयोजित करून त्याला राहुल गांधींनी मिशन महाराष्ट्र सुरू केल्याचं अधोरेखित झालं.

राहुल गांधींनी पक्ष मजबूतीसाठी तरुण नेत्यांना सोबत घेण्याचे संकेत याआधीच दिले होते. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा रंगली. मात्र, आता नाशिकमध्ये राहुल गांधींनी संघटनात्मक पुनर्बाधणीचे संकेत देत तरुण नेत्यांना आमदार-खासदारकीचे स्वप्न दाखवलेत. आता या नव्या रणनीतीमुळे महाराष्ट्र काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का? याबाबत चर्चा सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दिल्लीच्या साईभक्ताकडून साईबाबांना दीड लाखांचा चांदीचा मुकुट अर्पण

Accident News : भीषण अपघात! ट्रॉली आणि पिकअपची जोरदार धडक; २ जणांचा जागीच मृत्यू

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ३० ते ४० अतिरिक्त लोकल धावणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Hair Conditioner: गणरायाच्या आवडत्या फुलांपासून बनवा घरगुती हेअर कंडिशनर; केस होतील मऊ आणि चमकदार

Misal Pav Recipe: रविवारी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा झणझणीत पुणेरी मिसळ, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT