Rahul Gandhi News Saam TV
महाराष्ट्र

Rahul Gandhi News: मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या केली; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi in Lok Sabha 2023: मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या केली, अशी खरमरीत टीका राहुल गांधींनी केली आहे.

Ruchika Jadhav

Rahul Gandhi On PM Modi: मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधांनी लोकसभेत मोदी सरकारला चांगलंच घेरलं आहे. राहुल गांधी यांच्या संसदेतील एन्ट्रीनंतर विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतलाय. मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या केली, अशी खरमरीत टीका राहुल गांधींनी केली आहे. (Latest Marathi News)

भारत आपला आवाज आहे आपल्या जनतेचा आवाज आहे. त्या आवाजाची हत्या तुम्ही (भाजप)ने मणिपूरमध्ये केली आहे. याचा अर्थ तुम्ही मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. मणिपूरमधील नागरिकांना मारुन तुम्ही भारताची हत्या केली आहे. तुम्ही देशभक्त नाही तर देशद्रोही आहात, असा हल्लाबोल राहुल गांधींनी भाजपवर केला आहे.

राहुल गांधींनी मोदी सरकारवर हा आरोप केल्यानंतर लगेचच संसदेत मोठा गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधीना विरोध केला. पंतप्राधान नरेंद्र मोदी अद्याप मणिपूरमध्ये गेलेले नाहीत. मोदींनी मणिपूरात हिंदुस्तानाची हत्या केली आहे. त्यामुळेच मोदी तेथे जात नाहीत, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

जोपर्यंत तुम्ही हिंसा थांबवणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात असंच मी समजणार आहे. हिंदूस्तान सेना एका दिवसात मणिपूरमध्ये शांती आणू शकते, मात्र तुम्ही तसं करत नाही. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूस्तानचा आवाज ऐकू शकत नाहीत तर मग ते कुणाचा आवाज ऐकत आहेत? मोदी फक्त २ व्यक्तींचा आवाज एकतात, अशीही टीका राहुल गांधींनी मोदींवर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT