RAHUL GANDHI SLAMS BJP OVER GOKUL MILK UNION ROW saam tv
महाराष्ट्र

गोकुळमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींच्या एका पोस्टने राजकारण तापलं!

Gokul Milk Union chairman election latest news: गोकूळ दूध संघावरील अध्यक्ष निवडीवरून संघर्ष पेटलाय... अशातच गोकुळच्या या वादात थेट राहुल गांधींनीच उडी घेतलीय... राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? काँग्रेसनं गोकुळसाठी आता न्यायालयीन आणि रस्त्यावरच्या लढाईची तयारी कशी केलीय? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीतील सत्तासंघर्षात आता राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनीही उडी घेतलीय...गोकुळच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीनं 4 संचालक नेमलेत. यावरुनच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केलाय. हा दूध उत्पादकांच्या मतांवर पडलेला दरोडा असून जनमतातील भेसळ असल्याचं त्यांनी म्हटलंय. X वर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले,

गोकुळमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपचा पराभव केला.म्हणून भाजपने निवडणुकीनंतर नियम बदलून स्वतःचे 4 संचालक नेमले. 12चा आकडा 16वर नेला आणि बहुमत हिसकावून घेतले. हा दूध उत्पादकांच्या मतांवर पडलेला दरोडा असून जनमतातील भेसळ आहे.

सत्ता टिकवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाण्यास इतकी हवालदिल झाली आहे. दूध उत्पादकांच्या मतांची चोरी करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी - शेतकरी कधीही विसरत नसतात.

गोकुळच्या निवडणुकीची दखल घेत राहुल गांधींनी Xवर पोस्ट करून साडेपाच लाख दूध उत्पादकांमागे उभे राहण्याची भूमिका घेतल्यानं सतेज पाटलांनी त्यांचे आभार मानलेत...तर राहुल गांधींना गोकुळचा विषय कळलाच नाही, अशी टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलीय...

दुसरीकडे संजय राऊतांनी गोकुळसाठी महाविकास आघाडीनं एकत्र येण्याचं आवाहन केलयं...मात्र 2019 ला मॅन्डेट चोरी करूनच राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्रात सत्तेची खुर्ची मिळवली होती, असा पलटवार भाजपनं केलाय...

दरम्यान गोकुळमध्ये 5 संचालक नेमण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणारेय. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्पष्ट केलयं... काँग्रेस नेते पवन खेरा काय म्हणालेत पाहूयात...

काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार

राज्य सरकारनं कायदेशीर बदल करून गोकुळमधील लोकशाही प्रक्रियेचा कौल बदलण्याचा प्रयत्न चालवलाय

निवडणुकीत 13 जागा जिंकत काँग्रेस समर्थित पॅनेलनं बहुमत मिळवलं होतं

महायुतीच्या संचालकांकडून अध्यक्षपदाची निवडणूक वारंवार जाणीवपूर्वक थांबवली जातेय

निवडणूक झाल्यानंतर नियम बदलून 4 शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आलाय

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागून सहकारी संस्थांची स्वायत्तता जपणार

राहुल गांधींनी गोकुळच्या वादात उडी घेतल्यानं सहकाराची पंढरी मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचा हा वाद आता थेट राष्ट्रीय राजकारणापर्यंत पोहोचलाय..स्थानिक पातळीवर सुरू असलेली ही लढाई आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी राजकीय संघर्षाची ठरतेय... त्यामुळे 9 नोव्हेंबरला होणाऱ्या संघर्ष मोर्चाच्या निमित्तानं विरोधक गोकुळवरील सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांना कसं घेरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्वस्तातील ऑनलाईन सेल, अकाऊंट रिकामं करेल? ऑफर्सच्या लिंकवर क्लिक करताय? सावधान!

मुख्यमंत्र्यांचा शिंदेसेनेला दे धक्का! मंत्र्यांचे अधिकार काढले, महायुतीत वाद पेटणार?

Easy Rangoli Designs For Diwali: दिवाळीसाठी सोप्या 5 रांगोळ्या, डिझाईन्स आत्ताच सेव्ह करून ठेवा

राजेंनी पन्हाळ्याच्या पायथ्याशी काढला अफजल खानचा कोथळा; गोपीचंद पडळकरांनी बदलला छत्रपतींचा इतिहास

Government Scheme: ऐन दुष्काळात राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारची महत्त्वकांक्षी योजना बंद

SCROLL FOR NEXT