Rahul Gandhi Saamtv
महाराष्ट्र

Congress Party News: 'चोर म्हणणे चुकीचे, राहुल गांधींनी माफी मागावी...' कॉंग्रेसच्याच बड्या नेत्याने केली मागणी

Rahul Gandhi News Updates: आगामी निवडणुकांमध्ये होणारा फटका टाळण्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे या निवेदनात म्हणले आहे.

संजय डाफ

Rahul Gandhi Defamation Case: कॉंग्रेस नेते (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुणावली होती. ज्यानंतर राहुल गांधीची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशभरात भाजपविरोधात (BJP) विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

एकीकडे या निर्णयाविरोधात कॉंग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असताना राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे (Maharashtra Congress) सरचिटणीस आणि माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल गांधी प्रकरणावर आशिष देशमुख यांनी निवेदन प्रसिद्ध करत त्यांच्या माफीची मागणी केली आहे. आगामी लोकसभेसह सर्वच निवडणुकांमध्ये होणारा फटका टाळण्यासाठी आणि ओबीसींची व्होटबँक भाजपकडे जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे.” यासोबतच हायकमांड आपल्या मागणीवर नाराज होणार नाही, असेही त्यांनी या निवेदनात म्हणले आहे.

आशिष देशमुख म्हणाले की, याआधीही राहुलजींनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये माफी मागितली आहे. पण इथे ओबीसी समाजाचा मुद्दा आहे. राहुलजींनी माफी मागितली तर त्यांची प्रतिमा अधिक उठून दिसेल. आणि हा जो सगळा प्रकार सुरू आहे, तो शांत व्हायला काँग्रेसला मदत मिळेल. माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे इतर काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. परंतु, हा भावनांचा प्रश्न आहे. इथे फ़क़्त एक व्यक्ती दु:खी होत नाही, तर संपूर्ण ओबीसी समाजाला दुःख होत आहे. राहुलजींनी मोठ्या मनाने माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये काही दिवसांत निवडणुका आहेत आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये जेथे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने ओबीसी समाजाला अंगीकारण्याची गरज आहे आणि अशा परिस्थितीत जर एखाद्या चुकीच्या शब्दामुळे ओबीसी समाज नाराज झाला असेल तर नक्कीच माफी मागून ओबीसी समाज समजून घेईल, असेही आशिष देखमुख यांनी म्हणले आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

Dada Bhuse: मालेगावात शिक्षक भरती घोटाळा,शासनाला 2 कोटी 69 लाखांचा गंडा

Shailesh Jejurikar : मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G ला 'भारतीय' नेतृत्व; मराठमोळे शैलेश जेजुरीकर कोण आहेत? VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापूर महानगरपालिकेत 85 लाखांचा ड्रेनेज घोटाळा प्रकरण; कनिष्ठ अभियंता,वरिष्ठ लिपीक निलंबित

SCROLL FOR NEXT