Parbhani, jintur, chhatrapati sambhaji nagar saam tv
महाराष्ट्र

Yeldari Accident News : सांत्वनपर भेटीसाठी गेलेल्या दांपत्याचा अपघात; पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज सुरु

घरातील कर्ता पुरुषच अपघाती गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

राजेश काटकर

Parbhani : जिंतूर (jintur) तालुक्यातील यलदरी रस्त्यावर धावत्या दुचाकीवर अचानक विजेची तार पडल्यामुळे एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी (injured) झाले हाेते. ही घटना सात मार्चला दुपारच्या सुमारास घडली होती. दरम्यान या घटनेतील एकाचा छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhaji nagar) येथे उपचारा दरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. (Breaking Marathi News)

जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे येथील राहुल मळजी चव्हाण, वंदना राहुल चव्हाण व सिद्धार्थ चव्हाण हे दुचाकीवरून काकडे माणकेश्वर येथे सांत्वनपर भेटीसाठी गेले होते. यावेळी भेटून गावाकडे परतत असताना यलदरी रोडवरील इसार पेट्रोल पंप समोर अचानक विजेची तार दुचाकीस्वाराच्या अंगावर पडली होती.

यामुळे राहुल चव्हाणच्या पोटावर तार चिटकल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. घटनेच्या दिवशी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणीला हलवण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे राहूल यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल केले होते.

उपचारा दरम्यान हातात इजा झाली असल्यामुळे एक हात निकामी करण्यात आला होता परंतु प्रकृती अधिकच गंभीर होत गेली. यावेळी मृत्यूशी झुंज देत अखेर राहूलची प्राणजोत मावळली. शिवाय त्यांची पत्नी वंदना चव्हाण यांच्यावर उपचार चालू असून सध्या त्यांची देखील मृत्यूशी झुंज सुरु आहे. राहूल यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० खात्यात एकत्र येणार

Rose Sharbat : घरच्या घरी बनवा फ्रेश गुलाब सरबत, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT