Radhakrishna Vikhe Patil and Jayashree Thorat Saam Tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil: 'त्या' वादावर राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले, जयश्री थोरात यांच्याबद्दल काय म्हणाले? वाचा...

Maharashtra Politics: वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करत नाही, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

Satish Kengar

सचिन बनसोडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

महिलांचा अपमान होत असेल त्या ठिकाणी आम्ही कधीच समर्थन करणार नाही, असं भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंर्दभात ते असं म्हणाले आहेत. संगमनेर येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधता त्यांनी हे वक्तव्य केलं.

ते म्हणाले की, गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड झाली. या घटनेचे निषेध करणारे फलक गावागावात लावायला हवे होते. मात्र लागले नाही. गावामध्ये जागृती केली नाही, मग कोणत्या निवडणुकीला सामोरं जाणार? संगमनेरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण? यासंदर्भात आपण विचार केला पाहिजे. उमेदवार कोणीही असूद्या, युटी म्हणून आपण भूमिका घ्यायला हवी, असं ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

'वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करत नाही'

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ''चौथी सभा झाल्यानंतर सुजयच्या लक्षात आले, काहीतरी गडबड आहे. वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करत नाही. अर्ध्या तासात काठ्या कुऱ्हाडी घेऊन लोक जमा झाले. कार्यकर्त्यांना मारहाण करायची होती आणि सुजयवर सुद्धा प्राणघातक हल्ला करण्याचा डाव होता. संगमनेर तालुक्यात इतका दहशतवाद मी कधी बघितला नाही.''

विखे पाटील म्हणाले, ''महिलांचा अपमान होत असेल त्या ठिकाणी आम्ही कधीच समर्थन करणार नाही. सामान्य माणसात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांना काहीतरी निम्मित हवं होतं. इथल्या कंत्राटदारांचं काय करायचं ते बघू.. तुम्ही चिंता करू नका.''

ते पुढे म्हणाले, ''काँग्रेसच्या लोकांनी सभेत येऊन धिंगाणा घातला. राजकारणात कधी अशी घटना घडली नाही. घटनेचे राजकारण करून आम्हाला राज्यात बदनाम करण्याचे प्रयत्न तुम्ही करताय. चोराच्या सगळ्या उलट्या बोंबा सुरू आहेत. या तालुक्याचे नेतृत असं आहे की, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT