Radhakrishna Vikhe-Patil Saam Tv
महाराष्ट्र

Vikhe-Patil: हिंदुत्वाशी फारकत घेण्याचं काम फितुरांनी केलं; विखे-पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका

Radhakrishna Vikhe-Patil: महायुतीला मिळालेलं यश छत्रपतींच्या विचारांमुळेच मिळाले आहे, असं विखे-पाटील म्हणालेत.

Bharat Jadhav

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपतींच्या विचारांशी फारकत घेण्याचं काम केलंय. हिंदुत्वाशी फारकतीमुळेच निवडणुकीत त्यांचा पराभव झालाय, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलीय. विखे-पाटील शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

राज्यभरात आज शिवजयंती साजरी केली जात आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. शिवरायांना वंदन करताना मन भरून येतंय. नवा आत्मविश्वास सर्वांना मिळतो. शिवरायांच्या विचारधारेवर आधारीत आम्ही काम करतो. शिवरायांच्या विचारानुसार सामाजिक एकता हवी. महायुतीला मिळालेलं यश हे छत्रपतींच्या विचाराचं यश असल्याचं राधाकृष्ण विखे-पाटील म्हणालेत.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्या विचाराशी फारकत घेण्याचं काम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. हिंदुत्वाशी फारकत घेण्याच काम फितुरांनी केलं. अशा गद्दारांना जनतेने निवडणुकीत धडा शिकवला, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय.

बाळासाहेब थोरातांवर टीका

अहमदनगर मधील अप्पर तहसील कार्यालयाला स्थगितीवरून विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केलीय. अप्पर तहसील कार्यालयाला स्थगिती मिळाल्यानंतर काहींनी जल्लोष केला होता, त्यावरून टीका विखे-पाटील यांनी थोरातांवर हल्ला चढवला. अहिल्यानगर नाही तर सोलापूर जिल्ह्यातील अहमदनगर कार्यलयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. जनतेला सगळ्या सुविधा निर्माण करण्याचं आमचं काम आहे. वर्षानुवर्ष यांनी मक्तेदारी आणि दहशत निर्माण केली. त्यामुळेच विधानसभेला लोकांनी त्यांची दहशत झुगारून दिली. भ्रमिष्ट झालेल्या लोकांना पराभव पचवता येत नसल्याची टीका विखेंनी केलीय.

गुन्हेगारीवर काय म्हणाले विखे-पाटील

शिर्डीतील गुन्हेगारीचं उच्चाटन करण्याचं काम सुरू आहे. फूल हार विक्रीचा अधिकार संस्थान सोसायटीला दिलाय. अनाधिकृत फूल-हार विक्री करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्यात. प्रत्येक दुकानाच्या बाहेर दरपत्रक लावले जाणार आहेत. लुटमार करणारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. शिर्डीचं नाव बदनाम करू द्यायचं नाही असं विखे-पाटील म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

SCROLL FOR NEXT