Murlidhar Mohol Saamtv
महाराष्ट्र

Purandar Airport: पुरंदरमध्ये विमानतळ झाले तरी भूमिपुत्रांना न्याय मिळेल, मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही

Pune Airport to Get New Terminal Expansion Plans Underway: पुरंदरमध्ये विमानतळ झाल्यास भूमिपुत्रांना नक्कीच न्याय मिळेल, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

Bhagyashree Kamble

सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पुरंदर विमानतळाला स्थानिक गावकऱ्यांकडून टोकाचा विरोध होत आहे. सरकारकडून विमानतळासाठी शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुरंदर विमानतळासाठी जागा संपादित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुरंदरमध्ये विमानतळ झाले तरी भूमिपुत्रांना न्याय मिळेल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते.

भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही

पुरंदर विमानतळाबाबात मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुरंदर विमानतळबाबत जागा संपादित केली जाते आहे, अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे, भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असं मोहोळ म्हणाले. तसेच शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाबाबात, 'भूमिपुत्रांना न्याय दिला जाईल, त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं.

पुणे विमानतळाबाबत मोहोळ काय म्हणाले?

पुणे विमानतळाबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे विमानतळावर एक नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर, प्रवास करणाऱ्यांची संख्या ९० लाखांवर पोहोचली आहे. ३४ चेक इन काउंटर सुरू झाले आहेत, आणि जुन्या टर्मिनलवर २४ नवीन काउंटर लवकरच सुरू होणार आहेत. पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी २०० एकर जागा घेण्याचे नियोजन आहे. तसेच विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी खाजगी जागा म्हणून सरकार ६० टक्के मोबदला देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मेट्रोकडून थेट विमानतळापर्यंत सेवा, याबाबत सुद्धा चर्चा झाली असल्याचं मोहोळ म्हणाले.

विमानतळावर १० रूपयांत चहा अन् २० रूपयांत वडापाव

विमान प्रवास सामान्यांच्या आवाक्यात यावा म्हणून उडान योजनेअंतर्गत उडान कॅफे सुरू करणार असल्याचं मोहोळ म्हणाले. २० रुपयात कॉफी, १० रुपयात पाण्याची बॉटल अशा पद्धतीने खाद्य पदार्थ या कॅफेमधून पुणे विमानतळावरील उडान कॅफेमध्ये उपलब्ध केले असल्याचं मोहोळ म्हणाले. यावेळी त्यांनी स्वतः २० रूपे देऊन वडापाव विकत घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT