Damaged vehicles after a tyre burst triggered a major collision on the Pune–Solapur Highway near Bhigwan. saam tv
महाराष्ट्र

Baramati Accident: पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात;भरधाव कारचा टायर फुटला, दुभाजक ओलांडत दुसऱ्या वाहनाला कारची जबर धडक

Pune-Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवणजवळ एक भीषण अपघात झालाय. भरधाव गाडीचा टायर फुटल्याने दोन कार धडकल्या आहेत. यात तीन जण जखमी झाले आहेत.

Bharat Jadhav

  • पुणे–सोलापूर महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात

  • भरधाव इनोव्हा कारचा टायर फुटल्याने अपघात

  • कार दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या वाहनाला धडकली

मंगेश कचरे, साम प्रतिनिधी

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झालाय. सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव कारचा अचानक टायर फुटला. त्यानंतर भरधाव कार दुभाजक ओलांडत दुसऱ्या एका वाहनाला धडकली. या भीषण अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या दुर्घटनेत दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात भिगवण जवळील बीट कंपनी परिसरात झाला आहे.

प्रथमदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा कार पुण्याकडून सोलापूरकडे जात होती. त्यावेळी पुणे–सोलापूर महामार्गावरील भिगवणजवळ इनोव्हा कारचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हाइडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांच्या लेनमध्ये शिरली. त्यावेळी इनोव्हा कार पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या एका कार धडकली. , दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, सध्या पोलिसांकडून मार्गावरील वाहने सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली आहेत. दोन्ही कारच्या या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

पुणे-सोलापूर महामार्गावर स्कोर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात स्कोर्पिओ कारचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात घडला होता. गौरख त्र्यंबक माने असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर समाधान अंकुश बाबर, विजय सूर्यकांत माने, अलिकेश खान असे अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान बाबर यांचे मामा विजय माने, चुलत मामा गौरख माने व त्यांचे मित्र अलिकेश खान हे चौघेजण मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. काम झाल्यानंतर हे चौघेही गुरुवारी संध्याकाळी मुंबई येथून रात्री करमाळ्याकडे निघाले. हडपसर पुणे येथे सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आले, नंतर विजय माने हे स्कार्पिओ चालवण्यास बसले होते. तर त्यांच्या शेजारील सीटवर गौरख माने हे बसले होते.

तर पाठीमागील सीटवर समाधान बाबर व विजय माने हे बसले होते. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रयागधाम फाटा व कोरेगाव मूळ जवळ आले असता विजय माने यांचा स्कोर्पिओवरील ताबा सुटला आणि स्कार्पिओ कार ही हायवेवरून खाली उतरून झाडाला धडकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतील बिहार भवनवरुन वादाचा भडका, बिहार भवनचं बांधकाम थांबवून दाखवा

मेलो तरी 2 व्यापा-यांचा गुलाम होणार नाही, उद्धव ठाकरेंचा मोदी, शाहांवर हल्लाबोल

मराठमोळ्या डोंबिवलीत मराठी माणूस उपेक्षित, केडीएमसीकडून भैय्यांचे लाड, मराठींचा द्वेष

Sunday Horoscope : कामातले अडथळे होणार दुर, महत्वाची कामं होणार पूर्ण, ४ राशींची चांदी; वाचा रविवारचे राशीभविष्य

'अख्ख्या महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू'; गळ्यात भगवं उपरणं घालून इम्तियाज जलील यांचं मुंब्र्यात वक्तव्य

SCROLL FOR NEXT