Pune Nanded Vande Bharat Express launch date Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Vande Bharat Express : सोलापूरला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस, कुठून कुठे धावणार? वाचा सविस्तर माहिती

Pune-Nanded Vande Bharat express Update News : पुणे-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे. या नव्या गाडीला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी स्टेशनला थांबा मिळणार असून, प्रवासाचा वेळ ६-७ तासांवर येणार आहे.

Namdeo Kumbhar

Pune-Nanded Vande Bharat Express train stoppages and ticket fare update : सोलापूर जिल्ह्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. पुण्याहून नांदेडसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे, त्यासाठीचा सर्व्हे नुकताच पार करण्यात आला. या वंदे भारत एक्सप्रेसला सोलापूर जिल्ह्यात थांबा मिळणार (Solapur district new Vande Bharat train updates) असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे-नांदेड या वंदे भारत एक्सप्रेसला सोलापूर जिल्हातील कुर्डूवाडी जंक्शनला थांबा मिळणार आहे. पुणे-नांदेड या वंदे भारत एक्सप्रेसचे सर्व्हेक्षण झाले अशून डिसेंबर अखेर अथवा जानेवारी २०२६ मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची शक्यता रेल्वे विभातील सूत्रांनी सकाळला दिली आहे. (Pune–Nanded Vande Bharat Route Finalized: Stops, Travel Time & Ticket Details)

कुर्डूवाडी स्थानकाला थांबा मिळणार? Pune–Nanded Vande Bharat Express Kurduwadi station halt

पुणे-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन या गाडीला कुर्डूवाडीमध्ये थांबा (Pune–Nanded Vande Bharat Express to Stop at Kurduwadi) मिळणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठी सुविधा तयार होणार आहे. मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी सोय होणार आहे. सोलापूर आणि मुंबई या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कुर्डूवाडी येथे थांबते. पण सोलापूरहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी साडेसहा वाजता कुर्डूवाडीत येते तर मुंबईहून सोलापूरला निघणारी वंदे भारत रात्री ९ च्या आसपास कुर्डूवाडीमध्ये येते. त्यामुळे दुपारच्या वेळी पुण्याला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस नाही. जर पुण्याहून दुपारच्या वेळी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर याचा फायदा होईल, असे स्थानिकांनी सांगितलेय.

वंदे भारत एक्सप्रेसमुळे ५ तासांचा वेळ वाचणार - Pune Nanded high-speed train distance and duration

पुणे ते नांदेड हे ५५० किमीचे अंतर पार करण्यासाठी सध्या १० ते १२ तासांचा प्रवास करावा लागतो. पण वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास हे अंतर फक्त सहा ते सात तासात पार होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची चाचपणीही पूर्ण झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास मराठवाड्यातील प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबतच वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहे. त्याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. बार्शी, माढा, पंढरपूर, करमाळा या भागातून प्रवास करणाऱ्यांना ही वंदे भारत एक्सप्रेस फायद्याची ठरेल. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास कुर्डूवाडी, बार्शी या भागात राहाणाऱ्यांना नांदेडला जाण्याचीही सोय होणार आहे.

पुणे-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसला कोण कोणते थांबे ? Pune to Nanded Vande Bharat Express route and timing

पुणे आणि नांदेड वंदे भारत एक्सप्रेसल मर्यादीत थांबे देण्यात येण्याची शक्यता आहे. पुणे, कुर्डूवाडी, धाराशिव आणि नांदेड याच स्थानकावर ही वंदे भारत एक्सप्रेस थांबण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट १२०० ते २५०० या दरम्यान असण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्सप्रेसबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

SCROLL FOR NEXT