PUNE TOURIST DROWNS IN TARKARLI SEA, SEARCH ON FOR MISSING YOUTH saam tv
महाराष्ट्र

मालवण-तारकर्ली समुद्रात पुण्याचा पर्यटक बुडाला; एकाला वाचवण्यात यश, एकजण बेपत्ता

Pune Tourist Drowns In Tarkarli Sea: तारकर्ली समुद्रात पोहताना पुण्यातील दोन पर्यटक बुडाले. स्थानिकांनी एकाला वाचवले असून दुसऱ्या पर्यटकाचा शोध सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर ही दुर्घटना घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • मालवण-तारकर्ली समुद्रात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले.

  • स्थानिक ग्रामस्थांनी एका पर्यटकाला सुखरूप वाचवले.

  • समर्थ कर्पे नावाचा तरुण अद्याप बेपत्ता आहे.

विनायक वंजारे, साम प्रतिनिधी

मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेले पुण्यातील दोन पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. यातील एका पर्यटकाला वाचविण्यात यश आले आहे तर एक जण बेपत्ता आहे. स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावत दुसऱ्या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढले. समर्थ गणेश कर्पे (आंबेगाव, पुणे) असे पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर ऋषभ रविकिरण कदम असे वाचवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

ऋषभवर सध्या मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बेपत्ता पर्यटकाचा समुद्रात शोध घेण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ कदम आणि समर्थ कर्पे हे दोघे पुणे येथील 'रेवती एन्टरप्रायजेस'मध्ये कामाला होते. ते १९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. समाजकल्याण विभागातील आपले कार्यालयीन काम आटोपून ते मालवण येथे पर्यटनासाठी थांबले होते.

आज दुपारी हे दोघेही तारकर्ली येथील एमटीडीसी रिसॉर्टसमोरील समुद्रात पोहण्यासाठी गेले. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले असताना पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने समुद्रात उड्या मारल्या. ग्रामस्थांनी ऋषभ कदम याला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले, मात्र समर्थ कर्पे हा लाटांच्या तीव्र तडाख्यात सापडल्याने खोल पाण्यात वाहून गेला.

बीडमधील हिंगणी तलावात होडी उलटली; दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

बीडमधील धारूर तालुक्यात असलेल्या हिंगणी तलावात होडी उलटून दोन मुलींचा पाण्यातू बुडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. या मुलींचे कुटुंबीय मासेमारीचा व्यवसाय करतात. हाती आलेल्या माहितीनुसार, मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील ५ मुली हिंगणी तलावात पोहण्यासाठी गेले होते.

हिंगणी येथील पारवे कुटुंबातील पलक शामराव पारवे, दिव्या विकास कांबळे, मोहिनी भीमराव पारवे, तन्वी कोंडीराम पारवे, जानवी कोंडीराम पारवे या मुली हिंगणीचा तलावावर पोहण्यास गेल्या होत्या. तिथे असलेल्या मासे पकडण्याच्या होडीवर पलक, दिव्या आणि मोहिनी या तिघीजण बसल्या होत्या.होडी तलावाच्या आत गेल्यावर होडी अचानक उलटली, त्यात तिघीही पाण्यात बुडाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT