Dattatray Gade Saam Tv
महाराष्ट्र

Pune Swargate ST Depot Case : दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध सुरु, लवकरच सत्य समोर येणार

Datta Gade Pune Case: स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलीस दत्ता गाडेचा मोबाईल शोधण्यासाठी पुन्हा एकदा शिरूरमध्ये जाणार आहेत.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Dattatray Gade : स्वारगेट बस डेपोमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची चौकशी सुरु आहे. पण गाडेचा मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मोबाईलबाबत गाडेला विचारल्यास तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे दत्ता गाडेचा मोबाईल शोधण्यासाठी पोलीस पुन्हा शेतात जाणार आहेत.

पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर अत्याचार करुन आरोपी दत्ता गाडे फरार झाला होता. तो शिरूरच्या गुनाट गावात जाऊन लपला होता. ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या दत्ता गाडेला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठे सर्च ऑपरेशन केले होते. त्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी दत्तात्रय गाडेला ताब्यात घेतले होते.

आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलमध्ये गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे असू शकतात. फोनमधील कॉल रेकॉर्ड, मेसेज, लोकेशन डेटा आणि इतर डिजिटल माहिती आरोपीच्या हालचालींबाबत अधिक माहिती मिळवून देऊ शकतात. त्यामुळे दत्तात्रय गाडेच्या मोबाईलचा शोध घेण्यावर पोलीस भर देत आहेत.

दत्ता गाडे ज्या-ज्या ठिकाणी लपून बसला होता, त्या प्रत्येक ठिकाणी पोलीस मोबाईलचा शोध घेणार आहेत. आरोपीची डीएनए चाचणी पूर्ण झाली आहे. ज्या रिकाम्या बसमध्ये ही घटना घडली त्या बसची देखील फॉरेन्सिक चाचणी झाली आहे. प्राथमिक तपासात गाडेने त्याचा फोन गुनाट गावातल्या शेतात फेकल्याचे सांगितले. आता गुन्हे शाखेचे पथक त्या परिसरात जाऊन मोबाईलचा शोध घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Maharashtra Fort : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

SCROLL FOR NEXT