Beed Crime: मला राग अनावर झाला अन्..., गरीबाला निर्वस्त्र करून मारहाण का केली? सतीश भोसलेने सांगितलं खरं कारण

Satish Bhosale: बीडमध्ये एका व्यक्तीला निर्वस्त्र करून मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सतीश भोसले असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याचा आता आणखी एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये तो मारहाणीमागचं कारण सांगितले आहे.
Beed Crime: मला राग अनावर झाला अन्..., गरीबाला निर्वस्त्र करून मारहाण का केली? सतीश भोसलेने सांगितलं खरं कारण
Satish Bhosale VideoSaam TV News
Published On

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये संरपंच संतोष देशमुख यांची छळ करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. अशामध्ये बीडमध्ये कुख्यात गुंडांनी गरीब व्यक्तीला निर्वस्त्र करून अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीला मारहाण करणारी व्यक्ती सतीश भोसले असून तो भाजपचा कार्यकर्ता आहे. आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे बीडमधील राजकारण पुन्हा तापले आहे. या गरीब व्यक्तीला अशी मारहाण का केली यामागचे नेमकं कारण सतीश भोसलेने सांगितले आहे.

सतीश भोसले गरीब व्यक्तीला मारहाण करण्यामागचं कारण सांगताना म्हणाला की, 'सदरील व्हिडीओ चुकीचा असून तो 2 वर्षांपूर्वीचा आहे. माझ्या मित्राच्या कुटुंबातील महिलेची छेड काढल्याने मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या व्यक्तीला मारले. मला राग अनावर झाला त्यामुळे मी त्याला मारहाण केली. त्या महिलेने सांगितले त्यामुळे मी त्याला तिथे मारहाण केली. त्या व्यक्तीने माझ्या मित्रांची १० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.'

Beed Crime: मला राग अनावर झाला अन्..., गरीबाला निर्वस्त्र करून मारहाण का केली? सतीश भोसलेने सांगितलं खरं कारण
Satish Bhosale: सतीश भोसलेचा आणखी एक प्रताप, कारमध्ये फेकले नोटांचे बंडल, पाहा VIDEO

तसंच, 'संबंधित पीडित व्यक्ती हा तो व्यवहार मिटवण्यासाठी माझ्या घरी आला होता. मात्र त्याने पत्नीची छेड काढली म्हणून मला राग आला. मी छोटा कार्यकर्ता आहे. हा व्हिडीओ पूर्ण चुकीचा आहे त्याची सत्यता पहा. इतर विषय झाकण्यासाठी हे केले जात आहे. माझी विनंती आहे की मी त्याला मारहाण केली मी चुकलो आहे. पण तो चुकीचा होता.', असे देखील सतीश भोसलेने सांगितले.

Beed Crime: मला राग अनावर झाला अन्..., गरीबाला निर्वस्त्र करून मारहाण का केली? सतीश भोसलेने सांगितलं खरं कारण
Satish Bhosale: सतीश भोसलेच्या अडचणीत वाढ, २४ तासांत दुसरा गुन्हा; ढाकणे कुटुंब दहशतीखाली

बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील गरीब व्यक्तीला अमानुष मारहाण करण्यात आली होती. हा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणात अद्याप शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच मारहाण झालेल्या व्यक्तीचे नावही समोर आलेले नाही. मात्र मारहाण करत असलेला व्यक्ती सतीश भोसले असून तो भाजपचा पदाधिकारी आहे. त्याचबरोबर भाजपा आमदार सुरेश धस यांचा तो जवळचा समर्थक म्हणून याची तिकडे ओळख आहे. या प्रकरणांमध्ये स्वतः पोलिस फिर्यादी होऊन सुमोटोनुसार गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत कामत यांनी दिली.

Beed Crime: मला राग अनावर झाला अन्..., गरीबाला निर्वस्त्र करून मारहाण का केली? सतीश भोसलेने सांगितलं खरं कारण
Satish Bhosale Video : थारा पैसा, थारा नाम; अंगावर पैशांची उधळण, सतीश भोसलेचा माज, नोटांचे बंडल फेकत दुसरा Video समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com