Pune-Solapur Highway Accident Saam
महाराष्ट्र

रीलस्टार प्रतिक शिंदेच्या फॉर्च्युनरमुळे भीषण अपघात; तीन गाड्यांना धडक बसली, नेमकं काय घडलं?

Pune-Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावरील मदनवाडी (सकुंडे वस्ती) गावाच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली.

Bhagyashree Kamble

  • पुणे-सोलापूर महामार्गावर प्रतीक शिंदेच्या फॉर्च्युनरमुळे तीन गाड्यांचा भीषण अपघात

  • लाखोंचे नुकसान, पण सुदैवाने जीवितहानी टळली

  • भिगवण पोलिस ठाण्यात प्रतीक शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल

  • नागरिकांनी वाहतूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून कडक कारवाईची मागणी केली

पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडी (सकुंडे वस्ती)गावच्या हद्दीत रीलस्टार प्रतीक राम शिंदे याच्या चारचाकीमुळे भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात तीन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र, काही जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

अपघात नेमका कसा झाला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार निखील बाळासाहेब होले आपल्या क्रेटा गाडीतून महामार्गावरून जात होते. त्यावेळी रीलस्टार प्रतीक शिंदे याची भरधाव फॉर्च्युनर आली. फॉर्च्युनरनं क्रेटाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, क्रेटा पुढे असलेल्या मारूती वॅगनरवर आदळली.

परिणामी या भीषण अपघातात तिन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. तीनही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला. घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. स्थानिक आणि पोलिसांनी मदतकार्य केले. या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

सुदैवाने या भीषण अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, अपघातानंतर परिसरात चर्चांना उधाण आलं. 'लोकप्रियतेच्या नावाखाली काही लोक फिल्मीस्टाईल वाहनं चालवतात. यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा चालकांवर कठोर कारवाई करायला हवी',अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. या प्रकरणी प्रतीक शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jannat Zubair And Elvish Yadav: फैजलनंतर जन्नत झुबेर करते एल्विश यादवला डेट? 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण

Wardha : वर्ध्यात ३ ते ४ किलोची भलीमोठी गार पडली; तज्ज्ञांच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे कांग्रेस विरोधात आंदोलन

Second Hand Iphone : सेंकड हँड आयफोन घेताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवाच

Priyadarshini Indalkar: 'अधुरी बातों की तरह...'; 'दशावतार' निमित्त प्रियदर्शनी इंदलकरचा दिलकश अंदाज

SCROLL FOR NEXT