Pune Solapur highway accident latest news Saam TV Marathi
महाराष्ट्र

Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर अपघात, ३ जणांचा जागेवरच मृत्यू

Pune Solapur highway accident latest news : पुणे–सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. टायर पंचर झालेल्या टेम्पोला कारची जोरदार धडक; पोलिस तपास सुरू.

Namdeo Kumbhar

Pune Solapur highway accident : सोलापूर–पुणे महामार्गावर भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. इंदापूर तालुक्यातील डाळच नंबर दोन येथे भयंकर अपघात झाला. त्यामध्ये सोलापूरमधील सांगोल्यातील ३ जणांचा मृत्यू झाला. गुरूवारी सायंकाळी पाच वाजताच्या आसपास कारचा आपघात झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

इंदापूर झालेल्या या अपघातात इको गाडीतून प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांपैकी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आदिती अमर हातेकर (वय 25 वर्षे), सखुबाई ईश्वर गेजगे (वय 60 वर्षे) व जय अमर हातेकर (वय 2 वर्षे), सर्व रा. सांगोला, जि. सोलापूर यांचा समावेश आहे. अपघातात इको गाडीचे चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय 50 वर्षे, रा. पाटस) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच स्वाती कबीरदास गेजगे (वय 34 वर्षे) व समृद्धी कबीरदास गेजगे (वय 10 महिने), दोघीही रा. पाटस या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर–पुणे लेनवरून जाणारा आयशर टेम्पो (एम एच 13 सीयु 5163) याचा टायर अचानक पंचर झाल्याने वाहन चालकाने तो टेम्पो महामार्गाच्या साईडला अर्धवट आणि धोकादायक स्थितीत उभा केला होता. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीच्या इको (एम एच 12 एक्स ई 8816) या चारचाकी वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली.

घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : पुण्याजवळील ऐतिहासिक रत्न, 'या' किल्ल्यावर सुरू झाला मराठा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा

Maharashtra News Live Update: दहिसर-भाईंदर लिंक रोड प्रकल्पात भीषण अपघात; क्रेन प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Crime News: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; व्हिडिओ काढले, ब्लॅकमेल आणि टॉर्चर केलं, अखेर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

IED Blast: शक्तिशाली स्फोटात डीआरजीचे ३ जवान शहीद; नक्षलवाद्यांनी घडवून आणला हल्ला

Mango Side Effects: आंबे खाल्याने पिंपल्स येतात? डाएटिशियनने सांगितला हा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT