Indapur Police Missing Saam Tv
महाराष्ट्र

Police Missing : पोलिस हवालदार पहाटेपासून बेपत्ता, चिठ्ठित भयंकर वास्तव लिहिलं, वरिष्ठ अधिकारी गोत्यात येणार

Indapur Police: इंदापूरमधील पोलिस हवालदार बेपत्ता झाला आहे. या पोलिसाने एक चिठ्ठी लिहून वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी चिठ्ठीच लिहिले आहे. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Priya More

पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेला पोलिस हवलदार बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मंगळवारी पहाटेपासून हा पोलिस इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीमधून बेपत्ता झाला आहे. बेपत्ता होण्यापूर्वी या पोलिसाने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या पोलिसाची पत्नीने तक्रार दाखल केली आहे. या पोलिसाचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे इंदापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

पुण्याच्या इंदापुरातून पोलिस हवालदार विष्णू केमदारणे हे आज पहाटेपासून बेपत्ता झालेत. केमदारणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून या चक्कीतून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठ अधिाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी प्रतिक्रिया दिली असून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नीची तक्रार दाखल करून घेतली आहे.

पोलिस खात्याकडून या संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात असून त्याकाठी पोलिस पथक तयार करण्यात आले आहे. 'चिठ्ठीमध्ये केमदारणे यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी केली जाईल आणि त्या पद्धतीचा अहवाल कार्यालयाला पाठवला जाईल.', असं उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

बेपत्ता झालेल्या पोलिसाने चिठ्ठीत असे लिहिले आहे की, प्रियंका मी तुला चिठ्ठी लिहून ठेवून जात आहे. मला खूप वाईट वाटत आहे. परंतू मला आता सहन पण होत नाही. मला मागील दोन महिन्यांपासून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलिस हवालदार रासकर आणि पोलिस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.'

तसंच, 'मी तुझ्या मोबाईलवर त्याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग पाठविले आहे ते तू ऐकून घे तसेच तू तुझी व आपल्या मुलांची काळजी घे. तसेच तुला माझे सांगणे की, माझ्या या अवस्थेला व होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार राहतील.' या घटनेमुळे इंदापूरमध्ये खळबळ उडाली आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT