Shirur News Saam Tv
महाराष्ट्र

Shirur News: वडिलोपार्जित जमिनीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, दोन गटांत तुंबळ हाणामारी; थरकाप उडवणारा VIDEO

Shirur Clash Over Ancestral Land: शिरूरमध्ये वडिलोपार्जित शेतजमिनीवरून दोन गटामध्ये तुफान राडा झाला. शेताच्या बांधावरच एकमेकांवर दगड फेकले आणि हाणामारी केली. या प्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

रोहिदास गाडगे, शिरूर

शिरूरमध्ये वडिलोपार्जित जमिनीसाठी दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. दोन गट आमने-सामने येत महिला आणि पुरूषांनी अक्षरश: दगडाच्या सहाय्याने आणि लाथाबुक्क्या मारत एकमेकांना मारहाण केली. शिक्रापूरमधील कन्हूर मेसाई येथे ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. वडिलोपार्जित जमिनी अक्षरश: हे सर्वजण एकमेकांच्या जीवावर उठले. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन्ही गटांतील महिलांसह १४ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हूर मेसाई येथील पांडुरंग अनंता पुंडे यांच्या वडिलोपार्जित जमिनीसंबंधी बहिणीसोबत वाद सुरू आहे. ही जमीन न्यायप्रविष्ट असताना नाथा बबन उमाप हे त्यांच्या कुटुंबातील महिलांना आणण्यासाठी त्या जमिनीतून जात होते. त्यावेळी पुंडे आणि उमाप गटांमध्ये शाब्दिक वादातून तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, दोन्ही गटांनी एकमेकांवर दगड आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला करत मारहाण केली. यामध्ये अनेकजण जखमी झाले.

याप्रकरणी नाथा बबन उमाप (वय ३७ वर्षे रा. जातानग बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नाथा बबन उमाप, सोमनाथ अंकुश मुरकुटे, बेबनाबाई बबन उमाप, साविता दत्तात्रय शिवले, विक्रम उमाप, समीम उमाप, रोहन शिवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, पांडुरंग अनंता पुंडे (वय ६५, रा. कन्हूर मेसाई, ता. शिरूर), अनिकेत पुंडे, अनिल पुंडे, सुमन पुंडे, साईली पुंडे, स्वाती अनिल पुंडे, उच्चवाणी पुंडे (सर्व रा. कन्हूर मेसाई) आणि बापू धुमाळ यांच्या विरोधातही परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास शिक्रापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष शेंबडे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकी बहिण सरकारसाठी ‘गले की हड्डी’ ठाकरेसेनेच्या मुखपत्रातून सरकारला चिमटा, लाडकी ठरली सरकारसाठी दोडकी?

Sleeping Direction: वास्तुशास्त्रानुसार, कोणत्या दिशेने झोपणे चांगले आहे?

Crime: लग्नाला ३ वर्षे होऊनही मूल होत नाही, नवरा बायकोला घेऊन मांत्रिकाकडे गेला; शेतात नेऊन केला बलात्कार

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांनी भरवली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शाळा

Meta कडून 1 कोटी Facebook अकाउंट ब्लॉक; यात तुमचा तर अकाउंट नाही ना? का केली कारवाई?

SCROLL FOR NEXT