Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : पतसंस्थेवर दरोड्याचा प्रयत्न; रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन समोरील घटना

Pune Shirur News : रात्रीच्या अंधारात चोरटयांनी धाडस दाखवत अगदी पोलीस स्टेशन समोरील पतसंस्थेत प्रवेश करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पतसंस्थेत असलेली रक्कम वाचली आहे.

रोहिदास गाडगे

शिरूर (पुणे) : रात्रीच्या सुमारास पतसंस्थेवर चोरटयांनी दरोडा टाकण्यात आल्याची घटना रांजणगाव येथे समोर आली आहे. विशेष म्हणजे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर असलेल्या पतसंस्थेवर दरोडा टाकण्यात आल्याने चोरटयांनी एकप्रकारे पोलीस ठाण्यालाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या घटनेत चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. 

शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील गोरेश्वर मल्टीस्टिक पतसंस्थेवर अज्ञात चोरट्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ही पतसंस्था रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही मीटरवर असूनही चोरट्यांनी असा धाडसी प्रकार केल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी पतसंस्थेच्या आत प्रवेश करत तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी मजबूत असल्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. 

सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटे यात कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. मात्र या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस ठाण्याजवळ घडलेल्या या घटनेने सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.   

शिरूरमध्ये भरदिवसा महिलेची लुट

शिरुरच्या ओयासीस कॉलनीतील फुले तोडत असलेल्या छाया सातारकर (वय ६५) यांना अज्ञात दोन चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. मोबाईलवर पत्ता सांगण्यात गुंतवत त्यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना आज दुपारी घडली असून आरोपी युनिकॉर्न मोटारसायकलवरून फरार झाले. शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दिवसाढवळ्या झालेल्या या लुटीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: देशातील कोणत्या १२ राज्यात होणार SIR 2.0; कोण-कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Alibaug Tourism : अलिबाग फिरायला गेलाय? मग 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की पाहा

Maharashtra Live News Update: बच्चू कडूंच्या आंदोलनाला शरद पवार गटाचा पाठिंबा

Health Tips: गुळ की मध, आरोग्यासाठी काय फायदेशीर?

नाशिकमध्ये रामकुंडावर छटपूजेदरम्यान परप्रांतीयांमध्ये हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT