Hindu activists protesting at Shaniwarwada and performing Go-mutra ritual near the Mazar after Namaz went viral. Saam Tv
महाराष्ट्र

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

BJP MP Medha Kulkarni: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण केल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेत.. मात्र हे नमाज पठण कधी करण्यात आले? नमाज पठणाचा प्रकार घडल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी नेमकं काय केलं?

Suprim Maskar

पुण्याच्या प्रसिद्ध शनिवारवाड्यासमोरील उद्यानात काहींनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला.. त्यानंतर सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेकडून या घटनेचा निषेध करत.. शनिवारवाडा परिसरात घोषणाबाजी करण्यात आली....आंदोलकांनी गोमुत्र शिंपडून परिसराचं शुद्धीकरण केलं... तर इथून पुढे असे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिला...

मात्र हे आंदोलन इथेच थांबले नाही.. तर आंदोलकांनी शनिवारवाडा परिसरात असणाऱ्या मजारलाही विरोध केला. या परिसरात भगवा झेंडा फडकवू द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसचं खासदार मेधा कुलकर्णींनी मजार हटवण्यासाठी प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटमही दिला..

ही जागा ही पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना भगवा झेंडा फडकवण्यास विरोध केला. त्यामुळे तणाव वाढत गेला... अखेर आक्रमक आंदोलकांनी अनाधिकृत पीरजवळ भगवा झेंडा लावून आंदोलन संपवले...मात्र या घटनेनं

शनिवारवाड्यात नमाज पठण कोणी केलं? ती मजार खरचं अनाधिकृत आहे का? नमाजचा व्हिडिओ समाजमाध्यमात कोणी आणि कोणत्या उद्देशानं व्हायरल केला? असे अनेक सवाल उपस्थित होतायत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

बिबट्या आला रे...! आधी गावात दहशत, आता पुणे शहरात एन्ट्री, VIDEO

धनंजय मुंडेंना 'कराड'ची ओढ? कराडच्या आठवणीनं मुंडे व्याकूळ, VIDEO

Ethiopia volcano : इथियोपियात १०००० वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; आकाशात १०-१५ किमी उंच उडाले राखेचे कण, भारतावर संकट?

SCROLL FOR NEXT