Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News: 'लेशपाल ,आज तुझ्यामुळे...; पुण्यातील 'त्या' तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचं चाकणकरांकडून तोंडभरून कौतुक

पीडित तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणााचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे.

Vishal Gangurde

Pune News: पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पुणे हादरलं. या घडलेल्या घटनेत तरुणीवर हल्ला करणाऱ्या तरुणाच्या हातातून लेशपाल जवळगे नावाच्या तरुणाने कोयता हिसकावून घेतला. या संपूर्ण घटनेत लेशपाल याच्यासहित आणखी काही तरुणांनी धाडसीपणा दाखवत तरुणीचा जीव वाचवला. पीडित तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणााचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. (Latest Marathi News)

आज पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून मुलीवर कोयत्याने हल्लाचा प्रयत्न झाला. किमान 100-200 लोक असताना स्वतः कोयत्याचा वार घेऊन काही तरुणांनी तरुणीचा जीव वाचवला. सदाशिव पेठेतील संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.

यानंतर तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांचं सर्वत्र कौतुक आहे. लेशपाल जवळगे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांनी त्या तरुणीचा जीव वाचवला. या घटनाक्रमानंतर रुपाली चाकणकरांनी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्याा, 'लेशपाल ,आज तुझ्यामुळे एक जीव वाचला ,तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे. आज पुण्यामध्ये कोयत्याने तरुणीवर हल्ला करण्याचा गंभीर प्रकार घडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत लेशपाल जवळगे या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावून त्या पिडीत मुलीला हल्ल्यातून वाचवले. यावेळी गुन्हेगाराच्या हातातील कोयता हिसकावून घेताना लेशपालच्या बोटाला लहान इजा झाली आहे. लेशपाल तुझ्या धाडसाचे कौतुक वाटते, तू जीवनदान देण्याचे अमूल्य कार्य केले आहे'.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील सदाशिव पेठतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ मंगळवारी सकाळी एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत तरुणी थोडक्यात बचवली. त्याचबरोबर तिच्यासोबत असलेला मित्र देखील जखमी झाला आहे. शंतून जाधव असं आरोपीचं नावं आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT