Arrest Saam Tv
महाराष्ट्र

Junnar: गृहमंत्र्यांकडे तक्रार हाेताच पुणे ग्रामीण पोलीसांनी चार जणांना पकडले

कृषीपंप आणि केबल असा ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रोहिदास गाडगे

जुन्नर : जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरुर तालुक्यात कृषीपंप आणि विद्युत केबल चोरीमुळे शेतकरी त्रस्त झाले हाेते. यामुळेच शेतकऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडेच (dilip walse patil) थेट तक्रार केली. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस (pune rural police) अँक्शनमोडमध्ये आले. पाेलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन लवकचर टाेळी कार्यरत असल्यास त्याचा पर्दाफाश करु असा सध्या तरी शेतक-यांना (farmers) दिलासा दिला आहे. (junnar latest marathi news)

जुन्नर (junnar) आंबेगाव खेड आणि शिरुर (shirur) तालुक्यातील कॅनाॅल आणि नदीपात्रातील विद्युत कृषीपंप आणि केबल चोरी होत असल्याने उभी पिकं पाण्याअभावी जळुन जात होती. त्यामुळे शेतक-यांचे लाखों रुपयांचे नुकसान होत होते.

कृषीपंप आणि केबल चोरी करणा-या सराईत चोरांच्या टोळी सक्रिय असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा (lcb) आणि नारायणगाव (narayangoan) पोलीसांनी सापळा रचुन कृषीपंप विक्रीसाठी आलेल्या चार जणांना ताब्यात (arrest) घेतले. त्यांच्याकडुन कृषीपंप आणि केबल असा ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT